🌟पतंजली परिवाराकडून पेढगाव येथील शेतकरी विजय जंगले यांचा सन्मान....!


🌟साई नाट्यगृह सेलू येथे पतंजलीच्या वतीने विनोदराव बोराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत कार्यक्रम संपन्न झाला🌟 


                                
 परभणी (दि.३० मार्च) - परभणी जिल्ह्यातील सेलू येथे दि.२९ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ०५-०० वाजेच्या सुमारास पतंजली योगपीठ हरिद्वार शाखा सेलूच्या वतीने कार्यकर्ता बैठक योग आयुर्वेद भारतीय संस्कृती याविषयी परमपूज्य डॉक्टर स्वामी परमार्थ देव मुख्य प्रभारी पतंजली हरिद्वार यांनी उपस्थित साधकांना मार्गदर्शन केले हा कार्यक्रम साई नाट्यगृह सेलू येथे विनोदराव बोराडे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला.

यावेळी सेंद्रिय शेतीमध्ये उत्कृष्ट कार्य करणारे शेतकरी कृषी भूषण सोमेश्वर गिराम व राधिका गिराम यांचा स्वामीजींच्या हस्ते सत्कार करण्यात आला तसेच पेडगाव येथील संत्रा व लिंबू उत्पादक शेतकरी विजयराव जंगले व संत्रा नर्सरी शेतकरी विष्णू निर्वळ गोशाळा चालक राधाकिसन कदम व पत्रकार राम सोनवणे यांना सन्मानित करण्यात आले यावेळी व्यासपीठावर राज्य प्रभारी बापू पाडाळकर उदय वाणी आचार्य अविनाश अतुलजी आरे यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सोनेकर यांनी केले व आभार प्रदर्शन कैलास रकटे यांनी केले हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पतंजली परिवार सेलू यांनी परिश्रम घेतले....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या