🌟गंगाखेड येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील संबंधित अभियंत्यांच्या विरोधात कठोर कारवाई करा....!


🌟माजी खासदार तथा शिवसेना संपर्कप्रमुख अ‍ॅड.सुरेश जाधव पाटील यांची मुख्य अभियंत्यांकडे मागणी🌟

परभणी (दि.२९ मार्च) :  गंगाखेड येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील उपविभागीय अभियंता व दोघा शाखा अभियंत्यांविरोधात भारतीय दंड विधान कलम 406, 409, 420, 467, 468, 120 (ब) 34 प्रमाणे फौजदारी गुन्हे दाखल झाले आहेत. त्यामुळे त्या संबंधित अभियंत्या विरोधात तात्काळ निलंबनाची कारवाई करावी, अशी मागणी शिवसेनेचे संपर्क प्रमुख तथा माजी खासदार अ‍ॅड. सुरेश जाधव पाटील यांनी केली आहे.

          बांधकाम विभाग नांदेडच्या मुख्य अभियंत्यांना माजी खासदार जाधव यांनी दिलेल्या निवेदनाद्वारे या अभियंत्यांविरोधात कामातील कुचराई, उदासिनतेबद्दल गुन्हे दाखल झाले आहेत. त्यातील कलमे गंभीर आहेत. त्यामुळेच आपण गंगाखेडातील उपविभागीय अभियंता, दोन अभियंता यांच्या विरुध्द फौजदारी गुन्हे दाखल झाल्याबद्दल ताबडतोब कारवाई केली पाहिजे, अशी अपेक्षा माजी खासदार जाधव यांनी व्यक्त केली.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या