🌟आम्ही फक्त बोलत नाही करून दाखवितो 'हम साथ हैं'...मराठी पत्रकार परिषद है ना.....!


🌟अलिकडील काही घटनांवरून ते पुन्हा जगाला दिसलं🌟

मुंबई : आम्ही फक्त बोलत नाही करून दाखवितो हे मराठी पत्रकार परिषदेचे ब्रिद आहे.. अलिकडील काही घटनांवरून ते पुन्हा जगाला दिसलं.परळीच्या मराठवाडा साथीचे कार्यकारी संपादक प्रशांत जोशी यांचं काही दिवसांपुर्वी निधन झाल्यानंतर एस.एम.देशमुख यांनी त्यांच्या घरी जाऊन मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने आर्थिक मदत केली होती.. मात्र ती तुटपुंजी होती.. प्रशांत जोशी अधिस्वीकृतीधारक पत्रकार होते.. त्यामुळे त्यांच्या कुटुंबाला सरकारी मदत मिळाली पाहिजे अशी भूमिका मराठी पत्रकार परिषदेनं घेतली.. दत्ता अंबेकर यांनी कागदपत्रांची पुर्तता केली आणि परिषदेच्या पदाधिकारऱ्याकडे पाठपुरावा केला.. आता शंकरराव चव्हाण पत्रकार कल्याण निधीतून श्रीमती जयश्री जोशी यांना  एक लाखांची मदत मिळाली आहे.

*दुसरी घटना अकोल्याची :-

ज्येष्ठ पत्रकार दीपक देशपांडे यांच्या पत्नी संध्याताई देशपांडे यांना कॅन्सर झाला.. त्यांना मदत मिळावी म्हणून अकोला जिल्हा पत्रकार संघ, सिध्दार्थ शर्मा, अध्यक्ष मीरभाई यांनी परिषदेकडे पाठपुरावा केला.. परिषदेला यश आलं.. ही दोन्ही प्रकरणं काल झालेल्या कल्याण निधीच्या बैठकीत आली असता सर्व कागदपत्रांची पुर्तता केलेली असल्याने दोन्ही प्रकरण मंजूर झाली पाहिजेत असा आग्रह  मराठी पत्रकार परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे यांनी धरला.. प्रकरणं मंजूर झाली.. दोन्ही प्रकरणात एक लाख रूपयांची मदत मिळणार आहे.

धुळ्याचे ज्येष्ठ पत्रकार राधेश्यामजी  वर्मा नाशिक येथे कॅन्सरवर उपचार घेत आहेत अशी माहिती परिषदेला कळल्यानंतर परिषदेनं आर्थिक मदतीचा चेक त्यांना पाठविला.. शिवाय मराठी पत्रकार परिषदेचे उपाध्यक्ष गो. पी. लांडगे यांनी  आवाहन करून वर्मा यांच्या उपचारासाठी आर्थिक मदत मिळवून दिली..नांदेड येथील टाइम्स नाऊचे पत्रकार गौतम कांबळे यांचं अचानक निधन झालं.. राम तरटे आणि नांदेड जिल्हा पत्रकार संघाच्या पुढाकारातून  त्यांच्या कुटुंबियांना आर्थिक मदत दिली जात आहे...या सर्व सत्कार्यात ज्यांचा ज्यांचा हातभार लागला त्या सर्वांचे आभार.....प्रसंग कुठलाही असो,पत्रकार मित्रांनो मराठी पत्रकार परिषद कायम आपल्यासोबत आहे...असा आपुलकीचा संदेश देखील मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम.देशमुख देशमुख यांनी दिला आहे...

* मोहन चौकेकर मराठी पत्रकार परिषद 

बुलढाणा जिल्हा प्रसिध्दी प्रमुख

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या