🌟पुर्णेतील मुसाफिरखाना अतिक्रमण प्रकरणी नगर परिषद प्रशासनाकडून दिशाभूल.....!


🌟प्रहार जनशक्ती पक्षाने केले नगरपालिका परिषद कार्यालयात ठिय्या आंदोलन🌟


पूर्णा - पूर्णा शहरात असलेल्या निजाम कालीन मुसाफिरखाना पूर्णा नगरपालिकेच्या निष्काळजीपणामुळे अतिक्रमित झाला आहे तो तात्काळ अतिक्रमण मुक्त करून पूर्ण शहरात फिरणाऱ्या भटक्या विमुक्त व किरांना आसरा करण्याकरिता देण्यात यावा ही मागणी मागील दोन वर्षापासून करण्यात येत आहे. याबाबत काही दिवसापासून प्रहार जनशक्ती पक्ष पूर्णा नगर परिषद प्रशासनाचे निवेदनाद्वारे मागणी करत आहे वेळोवेळी नगरपरिषद प्रशासनाच्या वतीने अतिक्रमण काढून मुसाफिरखाना खुला केला जाईल असे लेखी आश्वासन प्रहार जनशक्ती पक्षात दिले होते परंतु मागील महिन्यात अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या नगरपरिषद कर्मचाऱ्यांना मुसाफिरखाना अतिक्रमण करणाऱ्या जाकीर हुसेन उर्दू शाळेतील शिक्षकांनी दमदाटी केली व तेथून हाकलून लावले.

आज प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने व शहर प्रमुख संजय वाघमारे यांच्या नेतृत्वाखाली मुसाफिरखाना अतिक्रमण मुक्त करून तो गरजवंता साठी खुला करण्यात यावा तसेच वेळोवेळी लेखी आश्वासन देऊन दिशभुल केल्या प्रकरणी पूर्णा नगरपरिषद मुख्य अधिकारी यांच्या दालना मध्ये ठिय्या आंदोलन करण्याचे ठरवले होते परंतु मुख्य अधिकारी कार्यालयात उपस्थित नसल्याने नगर परिषद कार्यालयाचे कार्यालय प्रमुख मुुम्तजीब खान व केशव दवंदे यांच्या कार्यालयात हे ठिय्या आंदोलन करण्यात आले.

मागील दोन वर्षापासून मुसाफिरखाना अतिक्रमण मुक्त करण्यात येईल असे लेखी आश्वासन देणाऱ्या पूर्णा नगर परिषदेने अचानक आपली भूमिका बदलत २००९ मध्ये नगर परिषदेने ठराव घेऊन मुसाफिरखाना हा जकिर हुसेन उर्दू शाळेला भाडे तत्वावर दिल्याचे सांगितल्याने प्रहार जनशक्ती पक्षाच्या पदाधिकारी आणि कार्यालय प्रमुख यांच्यात वाद झाला यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने यांनी ठरावाची प्रत पाहून हा ठराव नियम बाह्य पद्धतीने घेण्यात आला असून या विरोधात न्यायालयात दाद मागणार असल्याचे सांगितले व अश्या प्रकारचा ठराव झालेला माहिती असताना देखील मागील दोन वर्षापासून मुसाफिरखाना अतिक्रमण मुक्त करू असे लेखी खोटे आश्वासन का दिले म्हणून प्रशासनास जाब विचारल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.

या आंदोलनात भटके व फकीर आपल्या घरातील साहित्य व कुटुंबासह सहभागी झाले होते हे या आंदोलनाचे वेगळेपण होते.आंदोकांनी नगर परिषद प्रशासनाच्या विरोधात दिलेल्या घोषणांनी परिसर दणाणून सोडला होता. या आंदोलनात प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा प्रमुख शिवलिंग बोधने, शहर प्रमुख संजय वाघमारे, क्रांतीनगर शाखाप्रमुख अकबरी बेगम सय्यद मुनीर, अली नगर शाखाप्रमुख अय्यूब शब्बीर शाहा, हुसेन शहा, सलीम सिकंदर शहा, मुनीर सय्यद शब्बीर, पारधी जमातीचे धर्मा भोसले, रेणुका पवार, गंगाबाई पवार, शंकाई पवार, शेषकला भोसले व सर्व प्रहार जनशक्तीचे कार्यकर्ते उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या