🌟नांदेड येथे बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने शहिद भगतसिंह,सुखदेव राजगुरु यांना अभिवादन....!


🌟यावेळी शहिद भगतसिंह,सुखदेव राजगुरु यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले🌟


 
नांदेड (दि.२३ मार्च) : भारतीय स्वातंत्र्यलढ्यात आपल्या प्राणांची आहुती देत शहीद झालेल्या महान क्रांतिकारी शहिद भगतसिंह,सुखदेव आणि राजगुरु यांना शहीद दिननिमित्त आज शनिवार दि.२३ मार्च रोजी नांदेड येथील बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या वतीने अभिवादन करण्यात आले.

यावेळी बाबा फतेहसिंघजी बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष सरदार मनबीरसिंघ ग्रंथी यांच्यासह सामाजिक कार्यकर्ते जसबीरसिंघ बुंगई,जगदीपसिंघ नंबरदार,स.प्रेमजीतसिंघ शिलेदार,जगजीतसिंघ खालसा,बंटीसिंघ खालसा,बक्षीसिंघ पुजारी,गुरुप्रितसिंघ ग्रंथी आदी उपस्थित मान्यवरांनी शहिद भगतसिंह,सुखदेव आणि राजगुरु  यांच्या प्रतिमेचे पुजन करुन तसेच पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले...... 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या