🌟पुर्णेतील महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या शाखा व्यवस्थापकांकडून शेतकऱ्यांची आर्थिक अडवणूक व मानसिक छळवणूक ?


🌟आरबीआयच्या नियमानुसार पाच वर्षांत किसान क्रेडिट कार्डची थकीत रक्कम भरण्याचा नियम मग खात्यांना होल्ड का ?🌟

पुर्णा (दि.०४ मार्च) - भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमानुसार व्यक्तिमत्त्व कर्ज,जनावरांच्या खरेदीसाठी उचललेले कर्ज,ठिंबक सिंचन किंवा पाइपलाइन विंधन विहिरीसाठी,शेतीच्या विकासासाठी उचलेले कर्ज,वृक्षारोपणासाठी उचललेले पिक कर्ज अश्या उचललेल्या कर्जाची परतफेड पाच वर्षांच्या कालावधीत किसान क्रेडिट कार्ड धारक शेतकरी केव्हाही भरु शकतो असे असतांना मात्र महाराष्ट्र ग्रामीण बँकचे शाखा व्यवस्थापक कराड यांच्याकडून सन २०२२ यावर्षी 'किसान क्रेडिट कार्ड' योजने अंतर्गत कर्ज उचललेल्या व मागील अनेक वर्षांपासून कोरड्या व ओल्या दुष्काळाचा सामना करीत असलेल्या अन्नदाता शेतकऱ्यांनी आर्थिक अडवणूक करीत त्यांचा मानसिक छळ करीत असल्याचे व कर्जाची रक्कम भरल्यास नकार दिल्यास शेतकऱ्यांना शासकीय कामात अर्थळा आणल्या प्रकरणी कलम ३५३ अंतर्गत गुन्हे दाखल करण्यात येतील अश्या अशोभनीय भाषेचा देखील शेतकऱ्यांना वापर करीत असल्याचा गंभीर प्रकार शेतकऱ्यांच्या चर्चेतून समोर आला आहे.


महाराष्ट्र ग्रामीण बँक शाखा पुर्णेचे शाखाधिकारी अतूल भालचंद्र कराड हे मागील वर्षी शाखा व्यवस्थापक म्हणून बॅंकेत रुजू झाले असल्याचे समजते 'किसान क्रेडिट कार्ड' अंतर्गत पिक कर्जासह विविध कर्ज उचललेल्या कर्जदार शेतकऱ्यांकडून पिक कर्ज वसुलीसाठी शाखा व्यवस्थापक कराड रझाकारी नितीमत्तेचा तर अवलंब करीत नाही ना ? असा प्रश्न उपस्थित होण्यासारखी गंभीर परिस्थिती सर्वत्र निर्माण झाली आहे.एकीकडे मागील नोव्हेंबर २०२३ या महिन्यात पुर्णा तालुक्यासह संपूर्ण जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह झालेल्या ढगफूटी सदृश्य मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या शेतातील शेतातील सोयाबीन,तुर,मुग,उडीद,हायब्रीड ज्वारी,बाजरी,मका,साळ तसेच मोसंबी,संत्रा,केळी,चिक्कू आदी बागायती पिकांसह पालेभाज्यांचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते सरकारने नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना वाटपासाठी नुकसान भरपाईची रक्कम परभणी जिल्ह्यासह तालुक्यातील कोषागारात जमा केली असतांना देखील ओला दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना सदरील रक्कम अद्याप पर्यंत वाटप करण्यात आली नाही आणि त्यातच मार्च एंडिंगच्या नावावर महाराष्ट्र ग्रामीण बँकेकडून शेतकऱ्यांच्या खात्यावर होल्ड लावल्या जाण्याचा गंभीर प्रकार होतांना पाहावयास मिळत आहे.

महाराष्ट्र ग्रामीण बँकेने दत्तक घेतलेल्या पुर्णा तालुक्यातील खांबेगाव येथील जवळपास ३५ ते ४० टक्के शेतकऱ्यांच्या खात्यावर होल्ड लावल्यामुळे तसेच यासह जवळपास दहा/बारा जे महाराष्ट्र ग्रामीण बँकेत दत्तक आहेत अश्या गावांतील शेतकऱ्यांच्या खात्यावर होल्ड लावल्याने खात्यात जमा झालेल्या उसाच्या बिलाची रक्कम अडकून पडल्यामुळे अनेक शेतकरी हतबल झाले आहेत अनेक शेतकरी उद्भवलेल्या या गंभीर परिस्थितीमुळे आत्महत्ये सारखा मार्ग देखील स्विकारण्याची शक्यता वर्तवली जात आहे या गंभीर परिस्थितीत शेतकऱ्यांना आधार देण्याऐवजी प्रशासनासह बॅंकेतील अधिकारी देखील त्यांच्या खात्यांवर होल्ड लावून त्यांची आर्थिक अडवणूक करीत त्यांच्या मानसिक छळास कारणीभूत ठरत असल्याचे पाहावयास मिळत आहे.

 पुर्णेतील महाराष्ट्र ग्रामीण बँक खांबेगाव येथील शेतकरी करण कल्याणकर शेतकरी गिरिधर कदम,गजानन कदम,दत्ता कदम हे त्यांच्या खात्यात उसाचे बिल जमा झाल्यामुळे उंचावण्यासाठी गेले आसता असे सांगण्यात आले की तुम्ही जे २०२२ मध्ये पीक कर्ज घेतले आहे ते भरा तेव्हाच तुमच्या अकाउंट वरचा होल्ड काढण्यात येईल नाही तर त्या अकाउंटचा होल्ड काढण्यात येणार नाही यावेळी नमूद शेतकऱ्यांनी शाखाधिकारी कराड यांच्या निदर्शनास आणून दिले की बॅंक प्रशासनाने भारतीय रिझर्व्ह बँकेच्या नियमा विरोधात जाऊन शेतकऱ्याच्या खात्यावर होल्ड बसवला कसा ? असा प्रश्न उपस्थित केला जर तसा काही लेखी आदेश असेल तर लेखी स्वरूपात लिहन देणार का असी विचार पुस केली असता शेतकऱ्यांना अधिकारी/कर्मचाऱ्यांकडून उद्धट पणे बोलण्यात येत असुन शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरण कलम ३५३ अंतर्गत गुन्हे दाखल करण्याची धमकी धमकी देखील देण्यात येत असल्याचे काही शेतकऱ्यांनी बोलून दाखवले महाराष्ट्र ग्रामीण बँक प्रशासनाकडून अश्या प्रकारे शेतकऱ्यांच्या खात्यावर होल्ड लावून होणारी कर्जवसुली आरबीआयच्या नियमानुसार बेकायदेशीर आहे त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यावरील होल्ड शाखा व्यवस्थापक कराड यांनी तात्काळ काढून त्यांना त्यांच्या खात्यावरील ऊसाच्या बिलाची रक्कम अदा करावीं अशी मागणी होत आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या