🌟परभणी येथील कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालयात युवती कार्यशाळेचे आयोजन‌....!


🌟विद्यापीठ स्तरीय युवतीं कार्यशाळा.सोमवार दि.१८ मार्च ते दि.२० मार्च २०२४ या कालावधीत संपन्न होणार🌟 

परभणी (दि.१७ मार्च) - स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ,नूतन विद्यामंदिर शिक्षण संस्था संचलित कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित विद्यापीठ स्तरीय युवतीं कार्यशाळा.सोमवार दि.१८ मार्च ते बुधवार दि.२० मार्च २०२४ या कालावधीत  महाविद्यालयात संपन्न होणार आहे.

    या कार्यशाळेसाठी विद्यापीठ परिक्षेत्रातील रासेयो राबविणाऱ्या महाविद्यालयातील युवती सहभागी होणार आहेत.सोमवार,दि.१८ मार्च २०२४ रोजी सकाळी १२ वाजता उदघाटन होणार आहे.या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी हेमंतराव जामकर (अध्यक्ष,नूतन विद्या मंदिर शिक्षण संस्था, परभणी ) तर डॉ.मल्लिकार्जून करजगी (संचालक, रासेयो विभाग स्वारातीम विद्यापीठ नांदेड ) यांचे हस्ते होणार आहे.प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून संस्थेचे उपाध्यक्ष ॲड.किरणराव सुभेदार, कोषाध्यक्ष डॉ.अभयराव सुभेदार, सचिव विजयराव जामकर, सहसचिव डॉ.संजयराव टाकळकर, स्वारातीम विद्यापीठ नांदेड सिनेट सदस्य तथा प्रस्तुत महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. वसंतराव भोसले आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

     महिला व युवती सक्षमीकरण या हेतूने या कार्यशाळेत महिला सक्षमीकरण काल आज उद्या या विषयावर डॉ.अविनाश कदम संचालक, पृथ्वी विज्ञान शास्त्र विद्या विभाग स्वारातीम विद्यापीठ ,नांदेड चला,तर ऊर्जावान भारत घडवू या.याविषयावर डॉ.श्रीराम गव्हाणे, धर्माबाद. स्त्री भ्रृणहत्या प्रतिबंध काळाची गरज ॲड.शंकर कदम परभणी, सत्य साईबाबा चॅरिटेबल ट्रस्ट शाखा परभणीचे डॉ.ए.एल.शेळके हे महिलांचे आरोग्य समस्या आणि उपाय याविषयी आपले विचार मांडतील.डॉ. मल्हारीकांत सोंडगे  हे जाणिव एक सामाजिक महोत्सव याविषयी चिंतन करतील. बालविवाह प्रतिबंध लोक चळवळ व्हावी या विषयावर व्यक्त होतील डॉ.विशाल जाधव ( उपमुख्य कार्यकारी अधिकारी महिला व बालकल्याण विभाग,जि.प. परभणी.) ग्रामीण महिलांच्या मूलभूत समस्या आणि उपाय योजना या विषयावर सुरश्री मुदगलकर, डॉ.आशा आर्य आपले विचार मांडतील.डॉ.प्रभाकर हरकळ सुजाण समाज निर्माण एक आवाहन  या विषयी विचार मांडतील. प्राचार्य डॉ. विशाला पटनम या महिलांचे हक्क, अधिकार,संरक्षण, शिक्षण व आपत्ती व्यवस्थापन याविषयी व्यक्त होतील. राष्ट्रीय सेवा योजना आणि युवती या विषयावर सर्व शिबीरार्थीनी व रासेयो कार्यक्रमाधिकारी परिसंवाद करतील. या शिवाय योग, व्यायाम यासह शिबीरार्थीनी च्या वतीने सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे.

   तीन दिवसीय कार्यशाळा यशस्वीतेसाठी विविध समित्यांचे गठण करण्यात आले असून सर्व प्राध्यापक,कर्मचारी,रासेयो विद्यार्थीनी परिश्रम घेत आहेत.

   सदरील कार्यशाळेसाठी अधिकाधिक युवतींनी सहभाग नोंदवावा असे आवाहन संयोजक प्राचार्य डॉ.वसंतराव भोसले,कार्यशाळा समन्वयक प्रा.अरुण पडघन, डॉ.नसिम बेगम यांनी केले आहे.

       सदरील कार्यशाळा यशस्वीतेसाठी प्राचार्य डॉ.वसंतराव भोसले, डॉ.मल्लिकार्जून करजगी संचालक, रासेयो विभाग स्वारातीम विद्यापीठ, नांदेड यांचे मार्गदर्शन लाभत आहे.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या