🌟वाशिम येथे विशेष मोहिमेअंतर्गत ५६७ जात वैधता प्रमाणपत्राचे वाटप....!


🌟या प्रशिक्षणासाठी वाशिम जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक अनुज तारे यांची प्रामुख्याने उपस्थिती🌟 

फुलचंद भगत

वाशिम :- आद्यक्रांतीकारक उमाजी नाईक प्रमाणपत्र अभियानांतर्गत जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, वाशिम कार्यालयाच्या वतीने विशेष मोहिमेंतर्गत ५६७ जात वैधता प्रमाणपत्रे ऑनलाईन पध्दतीने वितरीत करण्यात आले. 

इयत्ता ११ वी, १२ वी विज्ञान मध्ये शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना, व्यावसायिक अभ्यासक्रमासाठी सीईटी देणाऱ्या विद्यार्थी तसेच सेवा व निवडणूक अर्जदारास ऑनलाईन व्हॅलिडीटी प्रमाणपत्र प्रदान करण्यासाठी विशेष मोहिमेचे आयोजन २६ फेब्रुवारी  ते ११ मार्च  या कालावधीत करण्यात आले होते. या विशेष मोहिमेंतर्गत ५६७ जात वैधता प्रमाणपत्रे ऑनलाईन पध्दतीने वितरीत करण्यात आले.

 या विशेष मोहिमेंतर्गत कार्यालयाच्या वतीने जात वैधता प्रकरणे नियमानुसार निकाली काढण्याच्या दृष्टीने जलदगतीने सुनावण्या, त्रृटी प्रकरणांवर त्वरीत कार्यवाही होण्यासाठी त्रृटी निवार शिबीरे, दक्षता पथक शिबीरे, जात वैधता प्रमाणपत्र कार्यपध्दती कार्यशाळा मार्गदर्शन शिबीर, ऑनलाईन वेबीनार, जात वैधता प्रमाणपत्र वाटप शिबीर इत्यादी कार्यक्रम घेण्यात आले.

          विद्यार्थी व सेवा निवडणूक यांचे त्रृटी पुर्तता कॅम्पद्वारे प्रकरणांमध्ये मोठ्या प्रमाणात त्रृटी पुर्तता करण्यात आली. तसेच जलद सुनावणीव्दारे २०० प्रकरणांच्यावर सुनावणी घेण्यात आली व अनेक प्रकरणे सुनावणीव्दारे निकाली काढण्यात आले. दक्षता पथकामार्फत शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी अर्जदार व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जिल्हा जात पमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयामार्फत विद्यार्थी व पालक यांच्या करिता जात वैधता प्रमाणवत्राबाबत कार्यपध्दती व मार्गदर्शनाबाबत ऑनलाईन वेबिनार आयोजित करण्यात आला होता. 

या ऑनलाईन वेबिनारव्दारे विद्यार्थी व पालकांना जात वैधता प्रामणपत्राबाबत येणाऱ्या अडचणी सोडविण्यात आल्या, असे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्या डॉ. छाया कुलाल यांनी कळविले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या