🌟स्वता:चे सुंदर व्यक्तिमत्व घडवत चांगले नागरिक बना.....!


   🌟प्राचार्य डॉ विशाला पटनम यांचे प्रतिपादन🌟  

महिलांनी समाजातील वाईट विचार नाकारावे.विधायक विचाराच्या साथीनं स्वता:त सकारात्मक बदल घडवून आणले पाहिजेत. स्वतःसह परिस्थिती आणि परिवारास आधार देताना शिक्षणाच्या साथीनं स्वतंत्राचा वापर करत अंगभूत कलागुणांना प्रोत्साहन देत कौशल्याधिष्ठीत क्षमता विकसित कराव्यात.लोकजीवनात गुलामी,लाचारीच समर्थन न करता स्वयंपूर्ण बना.निरोगी,निकोप असा संस्कारक्षम विज्ञाननिष्ठ समाज निर्माण कामी प्रत्येक युवतीने योगदान द्यावे असे आवाहन प्राचार्य डॉ विशाला पटनम यांनी केले.

      स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड कै.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालय,परभणी. राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने आयोजित विद्यापीठ स्तरीय रासेयो युवती कार्यशाळेत डॉ.विशाला पटनम बोलत होत्या.यावेळी या कार्यशाळेचे समन्वयक प्रा.अरुण पडघन यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला.महाविद्यालयीन शिक्षणातून अनेक सेवा,संधी आत्मसात करत व्यक्तीमत्व विकास साधता येतो.मी कै‌‌.सौ.कमलताई जामकर महिला महाविद्यालयाची माजी विद्यार्थीनी असून मला रासेयो ची उत्कृष्ट स्वयंसेविका म्हणून चांगलं काम करत विकसित होता आल.महाविद्यालय विविध संधी देत असते त्या संधींना ओळखत त्या वेळीच आत्मसात केल्यास युवतींना स्वतःच आचार विश्व निर्माण करता येत,अशी अनुभवजन्य  जडण-घडण सांगत सुप्रसिद्ध विधिज्ञ ॲड.नाहिन युसुफजई यांनी युवतींना सुजाण नागरिक बनण्याचा सल्ला दिला.

     युवतींनी ज्ञानाची कास धरत स्वता:त बिनधास्त पण वाढीस लावावे.डॉ.विशाला पटनम अभ्यासू आणि समर्पित असे आदर्श व्यक्तिमत्व आहे.त्यांची आचरण शैली विचारात घेत युवतींनी आपला विकास साधावा.ॲड.नाहीन सारख्या  विद्यार्थीनीं मुळे महाविद्यालयाची सर्वदुर ओळख झाली असे सुंदर  व्यक्तिमत्व विकासीत कराल असा सल्ला प्रा.निर्मला जाधव यांनी अध्यक्षीय समारोपात दिला.

        कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आरती बोधले हिने केले तर  राजकन्या फावडे हिने ‌आभार व्यक्त केले.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या