🌟पुर्णा महसूल प्रशासनाच्या पथकाने मौ.खांबेगाव परिसरातून अवैध चोरट्या वाळूची तस्करी करणारे टिप्पर घेतले ताब्यात....!


🌟नायब तहसीलदार थारकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाच्या धडक कारवायांनी वाळू तस्कर/मफियांच्या टोळ्या हादरल्या🌟

पुर्णा : पुर्णा तहसिल कार्यालयातील महसूल प्रशासनाची सुत्र नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांनी सांभाळतात संपूर्ण तालुक्यातील पुर्णा/गोदावरी नदीपात्रांतील शासकीय गौण खनिज वाळूचे रात्रंदिवस प्रचंड प्रमाणात अवैधरित्या उत्खनन करुन त्या चोरट्या वाळूची असंख्य वाहनांतून तस्करी करणाऱ्या वाळू तस्कर माफियाशाहीला चांगलीच जरब बसल्याचे निदर्शनाचा येत असून नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांच्या नेतृत्वाखालील महसूल प्रशासनाचे पथक अक्षरशः डोळ्यात तेल घालून अवैध वाळू तस्कर माफियांचा पाठलाग करीत असल्यामुळे वाळू तस्कर माफियांना पळता भुई कमी पडत आहे.

पुर्णा तालुक्यातील खांबेगाव शिवारात आज रविवार दि.०३ मार्च २०२३ रोजी मध्यरात्री ०३.०० वाजेच्या सुमारास नायब तहसीलदार प्रशांत थारकर व महसुलच्या पथकातील सहकारी साईनाथ दाढे, दाढे,शेलाटे व कलसाईतकर यांनी धडक कारवाई करत दोन ब्रास चोरट्या वाळूचे भरलेला टिप्पर ज्याचा क्रमांक एम.एच - १२ सीटी ९५१७ हे वाहन ताब्यात घेण्याची धडक कारवाई केली यापूर्वीच दि.०१ मार्च २०२४ रोजी नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांच्या नेतृत्वाखालील महसूल प्रशासनाच्या पथकाने तालुक्यातील कौडगाव/कान्हेगाव शिवारातील पुर्णा नदीपात्रातून ट्रॅक्टरसह एक केनी ताब्यात घेण्याची तर ०४ वाळू उपसण्यासाठी वापरल्या जाणारे तराफे तर कान्हेगावात ०१ तराफा जाळण्याची धाडसी कारवाई केली होती यावरून असे निदर्शनास येत आहे की महसुल प्रशासनाचे पथक पुर्णा/गोदावरी नदीपात्रांतील शासकीय संपत्ती असलेल्या गौण खनिज वाळूवर दरोड्यावर दरोडे टाकणाऱ्या वाळू तस्कर माफियांचा रात्रंदिवस पाठलाग करीत आहे त्यामुळे अवैध वाळू उत्खननासह तस्करीला बऱ्यापैकी लगाम लागला आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या