🌟पुर्णेतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आडमुठेपणाचे धोरण : बँकेच्या चौकटीला अपंग निराधार वयोवृद्धांच्या वेदनांचे तोरण...!


🌟नवा मोंढा परिसरातील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या दुसऱ्या मजल्यावरील पंचवीस/तिस पायऱ्या ठरत आहे जिवघेण्या🌟


पुर्णा (दि.११ मार्च) - पुर्णेतील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचे आडमुठेपणाचे धोरण : बँकेच्या चौकटीला अपंग निराधार वयोवृद्धांच्या वेदनांचे तोरण ? एकंदर अशी अवस्था शहरातील नवा मोंढा येथील जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेची झाली असून या बॅंकेत असंख्य विविध शासकीय योजनांतील निराधार वयोवृद्ध अपंग लाभार्थ्यांची खाती असल्यामुळे त्यांना आपले शासकीय मानधन काढण्यासाठी बॅंकेत जातांना अक्षरशः पंचवीस ते पायऱ्या चढाव्या उतराव्या लागत असल्याने सदरील बॅंक अधिकारी/कर्मचाऱ्यांनी या वयोवृद्ध अपंग निराधार महिला/पुरुष लाभार्थींना त्यांच्या खात्यावरील मानधन बॅंकच्या खाली देण्याची व्यवस्या करावी नसता बॅंकेची जागा बदलून बॅंकची शाखा खालच्या बाजूला आणावी अशी मागणी मागील अनेक दिवसांपासून होत आहे.

परंतु जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक प्रशासनातील अधिकारी/कर्मचारी बॅंकच्या पंचवीस ते तीस पायऱ्या चढताना वयोवृद्ध अपंग निराधार महिलांना होणाऱ्या वेदनांकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करीत असल्यामुळे बॅंक प्रशासनाच्या आडमुठेपणाच्या धोरणा विरोधात तीव्र असंतोष व्यक्त केला जात आहे.........


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या