🌟परभणी येथे लाईनमन दिनानिमित्त वीज कर्मचार्‍यांकडून करण्यात आले होते रॅलीचे आयोजन.....!


🌟शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते श्री शिवाजी महाविद्यालयापर्यंत भव्य रॅली संपन्न🌟

परभणी : परभणी शहरात काल मंगळवार दि.०४ मार्च २०२४ रोजी लाईनमन दिनाचे औचित्य साधून येथील वीज कर्मचार्‍यांच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते श्री शिवाजी महाविद्यालयापर्यंत भव्य रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.

लाईनमन हे महावितरणच्या वीज वितरण व्यवस्थेमधील अत्यंत महत्वाचा घटक आहे. महावितरणचे जनमित्र ऊन, वारा, पाऊस तसेच इतर अत्यंत खडतर परिस्थितीत ग्राहकांना सुरळीत वीजपुरवठ्यासाठी २४ तास सेवा देतात या लाईनमनबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी लाईनमन दिनानिमित्त सोमवार दि.०४ मार्च २०२४ रोजी सकाळी १०-०० ते दुपारी ०२-३० वाजेच्या सुमारास परभणी शहरातील श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सभागृहात लाईनमन दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या सुरूवातीला  महावितरण वीज कर्मचार्‍यांच्या वतीने शहरातील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापासून ते श्री शिवाजी महाविद्यालयापर्यंत वीज ग्राहकांच्या सुरक्षतेसाठी जनजागृती रॅली काढण्यात आली. यावेळी श्री शिवाजी महाविद्यालयातील सभागृहात आयोजित कार्यक्रमात महावितरण अधिकार्‍यांच्या वतीने जनमित्र लाईनमन कर्मचारी यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमास महावितरण अधिकारी कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या