🌟छत्रपती संभाजीनगरचे लोकसभा उमेदवार चंद्रकांत खैरे यांची विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी घेतली सदिच्छा भेट.....!


🌟छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघात  शिवसेनेचा भगवा ध्वज फडकावणार - अंबादास दानवे 

संभाजीनगर - शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे संभाजीनगर लोकसभेचे उमेदवार चंद्रकांत खैरे यांची रविवार ता. ३१ मार्च रोजी राज्याचे विधान परिषद विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी जालननगर येथील त्यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट घेतली. संभाजीनगर लोकसभेची उमेदवारी मिळाल्याबद्दल चंद्रकांत खैरे यांचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी अभिनंदन करत त्यांना  शुभेच्छा दिल्या. तसेच २०२४ च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीत संभाजीनगर मतदार संघावार शिवसेनेचा भगवा ध्वज फडकावण्यार असल्याचे अंबादास दानवे यांनी  या वेळी सांगितले.

संघटनेला सर्वस्व मानणारे आम्ही शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे निष्ठावंत शिवसैनिक असून उमेदवार घोषित होण्यापर्यंत आमच्या दोघात स्पर्धा असली तरीही आता पक्षाने उमेदवाराची घोषणा केली आहे. त्यामुळे पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांनी दिलेला निर्णय माझ्यासाठी अंतिम आहे. पक्षाने दिलेला उमेदवार निवडून आणण्याची विरोधी पक्षनेते व जिल्हाप्रमुख या नात्याने संपूर्ण माझी जबाबदारी असल्याची प्रतिक्रिया यावेळी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी दिली.

लोकसभा निवडणूक लढण्याची इच्छा मी स्पष्टपणे व्यक्त केली होती. त्याला मी नाकारत नसून पक्षांतर्गत मागणी पर्यंतच ती मर्यादित असल्याचे अंबादास  दानवे म्हणाले. तसेच पद आणि निवडणूक सातत्याने येत असतात परंतु संघटना कायमस्वरूपी टिकून असते.तिच्या बळकटीसाठी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे जसे देशभरात तळपत असून संभाजीनगर लोकसभा शिवसेनेचा बालेकिल्ला असल्याने येथील संघटनात्मक बांधणीसाठी आम्हीही असेच तळपणार असल्याची भावना यावेळी अंबादास दानवे यांनी व्यक्त केली.

पक्ष टिकला तर नेते टिकतात, त्यामुळे मी पक्षाचे काम करणार असून पक्षाने चंद्रकांत खैरे यांची उमेदवारी दिल्याने त्यांचा प्रचार करणार असल्याची ग्वाही अंबादास दानवे यांनी या वेळी दिली. संभाजीनगर लोकसभा मतदार संघात शिवसनेची ताकद मोठी असून आमचे संघटनात्मक काम सातत्याने सुरु असते.  त्यामुळे निवडणुकीच्या प्राचाराला घाबरण्याचे काहीही कारण नसून जोमाने काम केले तर शिवसेनेचाच उमेदवार निवडणुन येणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

    युतीमध्ये पक्ष फोडूनसुद्धा संभाजीनगर लोकसभा मतदार संघासाठी उमेदवार नसल्याचा टोला विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी लगावला.याप्रसंगी शिवसेना विभागीय सचिव अशोक पटवर्धन, माजी महापौर नंदकुमार घोडेले, महानगरप्रमुख रेणुकादास वैद्य, युवासेना उपसचिव ऋषिकेश खैरे, ऍड. आशुतोष डंख, उपजिल्हाप्रमुख अनिल पोलकर, उपशहरप्रमुख राजेंद्र दानवे, माजी नगरसेवक सचिन खैरे, शहर संघटक सचिन तायडे व श्रीरंग आमटे पाटील  उपस्थित होते.....

✍️ मोहन चौकेकर

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या