🌟नांदेड येथील प्रभात नगरातील भैय्यासाहेब आंबेडकर विहार येथे भारताचे निर्माते सम्राट अशोक २३२८ वी जयंती साजरी....!


🌟जयंतीचे आयोजन धम्माश्रय युवा विचार मंच व यशोधरा महिला मंडळ प्रभात नगर नांदेड यांच्या वतीने करण्यात आले होते🌟


 नांदेड : नांदेड येथील प्रभात नगरातील भैय्यासाहेब आंबेडकर हॉ्ल येथे काल शुक्रवार दि.२९ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ०७-०० वाजता भारताचे निर्माते देवानां प्रिय प्रियदर्शि धम्मराया चक्रवर्ती सम्राट अशोक यांची २३२८ वी जयंती साजरी  जयंती उत्साहात साजरी करण्यात आली.तथागत बुद्ध व त्यांचा महान धम्म यांचा प्रचार आणि प्रसार चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्यामुळे संपूर्ण विश्वात झाला असे ते महान 'धम्मदायाद' व संपूर्ण जगातील एकमेव चक्रवर्ती सम्राट अशोक यांच्या २३२८ व्या जयंतीचे आयोजन धम्माश्रय युवा विचार मंच नांदेड व यशोधरा महिला मंडळ प्रभात नगर नांदेड यांच्या वतीने करण्यात आले होते.


नांदेड शहरातल्या प्रभात नगर येथील भैय्यासाहेब आंबेडकर विहार  येथे आयोजित सम्राट अशोक जयंती प्रसंगी प्रथमतः तथागत गौतम बुद्ध व विश्वरत्न महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या मूर्तीला अभिवादन करून सम्राट अशोक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करीत जयंती साजरी करण्यात आली यावेळी सर्व बालक बालिका, उपस्थित होते, जेष्ठ समाजसेविका भारतीबाई सदावर्ते, पारुमाय सरपाते,विमलबाई गच्चे, भारतीबाई गच्चे, व सामाजिक कार्यकर्ते, उन्मेष ढवळे, भारत खिल्लारे जनार्दन आठवले, राहुल सूर्यतळे, संदीप वाटोरे, महेश जोंधळे, अजय थोरात,चेतन सावंत, संबोदित कांबळे, राहुल गायकवाड, दास निखाते ,निलेश थोरात, सोनू बुक्त्तरे, सौरभ कदम,तुषार खरे,शोरभ कदम,चिकू नरवाडे, विशाल धाईजे व प्रभात नगर येथील सर्व बोद्ध उपासक उपासिका व नवयुवक भीमसैनिक उपस्थित होते.....

             


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या