🌟हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातल्या खुडज येथील २४ भाविकांना भगर खाल्याने विषबाधा....!


🌟 हिंगोली जिल्हा अन्न औषध प्रशासनाचा उंटावरून शेळ्या हाकण्याचा गंभीर प्रकार🌟

✍🏻शिवशंकर निरगुडे - हिंगोली

हिंगोली : एकादशीच्या दिवशी भगर खाल्ल्याने हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातल्या खुडज येथील २४.भाविकांना विषबाधा झाली. यातील २० भाविकांना.सेनगाव येथील शासकीय रूग्णालयात तर एका भाविकास हिंगोली येथील खासगी रूग्णालयात ७ मार्च रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास दाखल करण्यात  आल्याची माहिती ग्रामस्थांनी दिली. सेनगाव तालुक्यातील खुडज येथील भाविक दर पंधरवड्या एकादशीला नर्सी नामदेव येथे दिंडी घेऊन.जातात. ७ मार्च रोजी नेहमीप्रमाणे २० ते २५ भाविक खुडज येथून नर्सी येथे गेले होते. नामदेव महाराजांचे दर्शन घेतल्यानंतर ते परत खुडजकडे निघाले. वाटेत.हिंगोली- सेनगाव मार्गावरील गिलोरी फाटा येथे त्यांनी.आपल्या सोबत नेलेली भगर व शेंगदाण्याची आमटी शिजवून खाल्ली. त्यानंतर सर्व भाविक गावाकडे.परतले. परंतु, रात्री ८:३० वाजेच्या सुमारास काही भाविकांना मळमळ होऊन उलट्या होत होत्या. तर काहीचे डोके दुखत होते. त्रास वाढत असल्याने रात्री १०:३० वाजेच्या सुमारास २० भाविकांना सेनगाव येथील रूग्णालयात दाखल करण्यात आले. 


सध्या सेनगाव येथील शासकीय रूग्णालयात रामचंद्र संभाजी साबळे (५५),वच्छलाबाई रामचंद्र साबळे.(५०), सिताराम संभाजी साबळे (६५), लिलावती बळीराम धोटेकर (७०), सिताराम नामदेव झाटे (५७), अश्विनी गोपाळ टाले (२६), पुरूषोत्तम माणिकराव टालेb(५५), लक्ष्मीबाई नारायण झाडे (४५), वर्षा विठ्ठल झाडे (४०), किसन तान्हाजी झाटे (६५), आश्रोबा नामाजी झाडे (६०), मंजूळाबाई कुंडलिक झाटे (५०), विठ्ठल बळीराम टाले (६०), छाया रमेश टाले (३५), राजेश.त्र्यंबक टाले (४५), द्वारकाबाई बालकिशन झाडे (५५),.रामेश्वर बालकिशन झाटे (४०), सविता रामेश्वर झाडे.(३५), कमल दत्ता गिरी (४५), निवृत्ती विठोबा टाले.(५९) यांच्यावर उपचार करण्यात येत आहेत. तर अन्नपूर्णाबाई गंगाराम टाले यांच्यावर हिंगोली येथील खासगी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. या सर्व भाविकांची प्रकृती चांगली असल्याची माहिती वैद्यकीय अधिकाऱ्यांनी दिली.

*अन्न औषध प्रशासनाचे उंटावरून शेळ्या हाकण्याचे प्रकार :-

हिंगोली जिल्हा निर्मिती होऊन सुमारे 24 वर्षाचा कालावधी झाला तरी हिंगोलीत अन्न व औषध प्रशासनाचे कार्यालय सुरु झाले नाही. परभणी येथूनच या कार्यालयाचा कारभार पाहिला जात आहे. त्यामुळे जिल्हयात भेसळखोरांना रान मोकळे झाले आहे. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी केवळ 'महिन्यातून एकदा ' हिंगोलीत येत असल्याचा आरोप केला जात आहे.गेल्या महीन्यात दि 20/02/2024 रोजी देखील कळमनुरी तालुक्यातील रेणापूर येथील सुमारे 100 भाविकांना भरीतून विषबाधा झाली होती आज या एकादशिला देखील सेनगाव तालुक्यातील खूडज येथील भाविकांना विषबाधा झाली आहे मग अन्न औषध विभाग काय करत आहे असा प्रश्न ग्रामस्थांच्या वतीने उपस्थिती केला जात आहे.........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या