🌟पुर्णेतील डिझेल महाघोटाळ्यातील घोटाळेबाजांवर तपास यंत्रणा का मेहेरबान ? आरोपींना मिळतोय जणू शासकीय सन्मान....!


🌟डिझेल चोरी प्रकरणातील आरोपी कार्यालयीन अधिक्षकाच्या अंतरीम जामीनाची मुद्दत ११ मार्च रोजी संपली पुढे काय ?🌟

पुर्णा (दि.१२ मार्च) - दक्षिण मध्य रेल्वेच्या नांदेड विभागातील अत्यंत महत्त्वाचे जंक्शन रेल्वे स्थानक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकावरील डिझेल डेपोवर मागील जवळपास दिड दशकांपासून डिझेल चोरट्यांसह डिझेल घोटाळेबाजांची वक्रदृष्टी पडली असतांना याकडे रेल्वे प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांचे लक्ष कसे गेले नाही ? असा प्रश्न उपस्थित होणार नाही तर नवलच म्हणावें लागेल परंतु या डिझेल चोरी अर्थात महा घोटाळ्यातील घोटाळेबाजांनी लक्ष्मीअस्त्राचा वापर करीत अनेकांना दृष्टीहीन केल्यामुळे हा गंभीर प्रकार सातत्याने सुरुच होता परंतु या घोटाळेबाजांचे दुर्दैवच म्हणावें लागेल की दि.२९ जानेवारी २०२४ रोजी पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकावरील डिझेल डेपोवर डिझेल पुरवठा करण्यास आलेले डिझेल टँकर क्रमांक एम.एच.२१ बीएच ३९४४ हे अर्धवट खाली करून उर्वरित डिझेल काळ्या बाजारात विक्रीसाठी जात असतांना परभणी जिल्हा स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने दैठणा पोलीस स्थानकाच्या हद्दीतील सिंगणापूर फाटा परिसरातून ताब्यात घेत या रेल्वे डिझेल डेपोतील डिझेल चोरी प्रकरणाचे पित्तळ उघडे पाडले.

पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकावरुन धावणाऱ्या जवळपास पस्तीस ते चाळीस रेल्वे गाड्यांच्या डिझेल इंजनांना येथील फिलिंग पॉईंट वरुन इंधन साठा अर्थात डिझेल साठा केला जात असल्यामुळे या ठिकाणी असलेल्या डिझेल डेपोला जवळपास आठ ते दहा डिझेल टँकर द्वारे पुरवठा होत होता त्यामुळे या डिझेल डेपोत कारभार हाताळणाऱ्या कार्यालयीन अधिक्षकांसह कर्मचाऱ्यांची देखील यावर वक्रदृष्टी पडली जवळपास दिड दशकांपासून हा डिझेल घोटाळा सुरू असल्याचे रेल्वे कर्मचारी वर्गातून बोलले जात आहे या प्रकरणातील तत्पूर्वी रेल्वे सुरक्षा बलात असलेला व नंतर मेडिकल अनफिट होऊन रेल्वे कन्सुंमर डेपोत कार्यरत झालेला मुख्य कार्यालय अधिक्षक माधव बलफेवाड याच्या जवाबातून मुख्य कार्यालयीन अधिक्षक मोहम्मद इस्लाऊद्दीन उर्फ मोबीन याचे नाव देखील या प्रकरणात समोर आले परंतु सदरील आरोपीने तपासातून पळ काढत अटक टाळण्याच्या हेतूने जिल्हा व सत्र न्यायालय औरंगाबाद येथे अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला दि.१४ फेब्रुवारी २०२४ रोजी जिल्हा व सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळून लावल्यानंतर मोहम्मद इस्लाऊद्दीन उर्फ मोबीन याने उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात अटकपूर्व जामीनासाठी दि.२० फेब्रुवारी २०२४ रोजी अर्ज दाखल केला या अर्जावर उच्च न्यायालयाने त्याला दि.१४ मार्च २०२४ पर्यंत अंतरिम जमानत आदेश पारित केला सदरील आदेशात असे नमूद केले होते की नमूद आरोपी मोहम्मद इस्लाऊद्दीन उर्फ मोबीन याने दि.२८ फेब्रुवारी ते दि.०२ मार्च २०२४ या कालावधीत प्रत्येक सकाळी १०-०० ते दुपारी ०२-०० वाजेपर्यंत पुर्णा रेल्वे सुरक्षा बलाच्या कार्यालयात हजर राहून गुन्ह्यांतील तपास अधिकाऱ्यांना तपासकामी सहकार्य करावे असे नमूद करण्यात आले दि.११ मार्च २०२४ रोजी अंतरिम जमानतीची मुद्दत संपल्यानंतर कायम अटकपूर्व जामीन मिळण्यासाठी अर्ज केलेल्या अर्जदार आरोपी मोहम्मद इस्लाऊद्दीन उर्फ मोबीनचे वकील प्रकृती अस्वस्थतेमुळे हजर राहू न शकल्याने सन्माननीय उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने अटकपूर्व जामिन अर्ज क्र.२०२४/२९१ वरील निकालाला दि.१८ मार्च २०२४ पर्यंत स्थगिती दिली आहे.

पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकावरील डिझेल डेपोवरील डिझेल घोटाळ्याचा तपास करणारे रेल्वे सुरक्षा बलाचे अधिकारी पो.नि.अरविंद कुमार शर्मा व सहकारी अधिकारी कर्मचाऱ्यांच्या तपासावर गंभीर प्रश्न चिन्ह निर्माण होत असून या प्रकरणाचा तपास करणारे संबंधित अधिकारी सखोल तपास करण्याऐवजी केवळ दि.२९ जानेवारी २०२४ या एकदिवसीय घटने पुरताच तपास करीत असून रेल्वे डिझेल डेपोतील डिझेल चोरी मागील जवळपास दिड दशकांपासून होत असतांना गुन्ह्याची व्याप्ती किरकोळ स्वरूपात दाखवून या गंभीर गुन्ह्यातील मोठमोठ्या अजगरांना वाचवण्याचा केविलवाणा प्रयत्न केला जात आहे.दरम्यान या रेल्वे डिझेल चोरी प्रकरणातील अन्य आरोपी डिझेल टँकर मालक संतोष सोपानराव पवार यांच्या नावे जवळपास दहा ते पंधरा डिझेल टँकर असल्याचे नमूद करण्यात आले आहेत परंतु यातील केवळ तिन चार टँकर वगळता अन्य टँकर ताब्यात का घेतले गेले नाही ? असा प्रश्न उपस्थित होत आहे तर याच प्रकारातील एक आरोपी इंडियन ऑईल पेट्रोलपंप मॅनेजर रामचंद्र यादव यांच्याकडून कोणता व किती मुद्देमाल हस्तगत करण्यात आला ? या प्रश्नाचे उत्तर देखील अद्याप गुलदस्त्यात आहे दरम्यान या गुन्ह्यांत जवळपास डझनभर आरोपी असतांना आरोपींचे चेहरे उघड करण्याऐवजी लपवले का जात आहे सदरील प्रकरणाचा तपास सीबीआय किंवा प्रवर्तन निर्दशालयाकडे वर्ग करण्यास जाणीवपूर्वक टाळाटाळ केली जात असल्याने कोट्यावधी रुपयांच्या या रेल्वे डिझेल घोटाळ्याच्या तपास अधिकाऱ्यांनी विश्वासाहर्ता गमावल्याने सदरील गुन्ह्याचा तपास सीबीआय किंवा प्रवर्तन निर्दशालयाकडे वर्ग करण्याची मागणी होत असून या गंभीर प्रकरणानंतर सातत्याने रेल्वेतील एकेक कागदपत्रे असलेल्या स्टोअर रुमला आगी लागत आहेत की लावल्या जात आहेत याचा देखील सखोल तपास होण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.....


✍🏻नोट : अल्पबुध्दीजिवींनी बातमीची कॉफी करुन शोध पत्रकार असल्याच्या आवेशात वावरण्याचा मुर्खपणा करु नयें...


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या