🌟पुर्णा नदीपात्रातून चोरट्या वाळूची तस्करी करणारे ट्रॅक्टर ट्रालीसह महसूल प्रशासनाच्या पथकाने घेतले ताब्यात....!


🌟नायब तहसीलदार प्रशांत थारकर यांच्या नेतृत्वाखालील पथक अवैध वाळू तस्कर माफियांच्या विरोधात सक्रिय🌟 

पुर्णा (दि.२८ मार्च) - पुर्णा तालुक्यातील गोदावरी/पुर्णा नदीपात्रातून मोठ्या प्रमाणात अवैधरित्या वाळूचे उत्खनन करुन या चोरट्या वाळूची वाहतूक करणाऱ्या वाळू तस्कर माफियांच्या विरोधात नायब तहसिलदार प्रशांत थारकर यांच्या नेतृत्वाखालील पथक सक्रिय झाल्याचे निदर्शनास येत असून या मार्च महिन्यात महसूल प्रशासनाच्या पथकाने एकामागून एक अश्या चार पाच कारवाया केल्याचे निदर्शनास येत असून नायब तहसिलदार प्रशांत थारकर यांच्या नेतृत्वाखालील पथकाने आज गुरुवार दि.२८ मार्च २०२४ रोजी मध्यरात्री ०२-०० वाजेच्या सुमारास पुर्णा नदीपात्रातून अवैधरित्या वाळू वाहतूक करणाऱे ट्रॅक्टर ट्रालीसह ताब्यात घेतले.

महसूल प्रशासनाने केलेल्या या करवाई वेळी पथक प्रमुख तथा नायब तहसीलदार प्रशांत थारकर याच्यासह कोतवाल मुंजाजी चव्हाण व कोतवाल मंगेश गायकवाड आदींचा सहभाग होता दरम्यान महसुल प्रशासनाच्या पथकाने अवैध वाळू उत्खननासह तस्करीला लगाम लागावा याकरिता शहरातील पोलिस दलाचे तिसरे नेत्र म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सिसीटीव्ही कॅमेऱ्यांचा देखील आधार घेऊन रात्रीच्या सुमारास असंख्य टिप्पर/हायवा व ट्रॅक्टर ट्रालीच्या साहाय्याने शासकीय गौण खनिज वाळूची तस्करी करणाऱ्या तस्कर माफियांच्या विरोधात कायद्याचा बडगा उगारुन त्यांची कालबाह्य झालेली वाहन स्क्रॅप मध्ये घालावी तसेच शासकीय गुत्तेदार खाजगी बांधकाम करणाऱ्यांना सहज उपलब्ध होणाऱ्या वाळू साठ्यांचे रितसर पंचणामे करून त्यांच्याकडे वाळू पुरवठा करणाऱ्यांच्या रॉयल्टी भरलेल्या पावत्या आहेत काय याची देखील चौकशी करून सदरील वाळू साठे ताब्यात घेण्यात यावे अशी मागणी जनसामान्यांतून होत आहे.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या