🌟जरांगे पाटील उद्या नांदेड दौऱ्यावर : सकल मराठा समाज संवाद बैठकिला करणार मार्गदर्शन.....!


🌟सकल मराठा समाज बांधवांसोबत संवाद साधण्याची चांदोजी मंगल कार्यालय येथे साय.7.30 वाजता उपस्थित राहणार🌟 

नांदेड :- मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मराठा योद्धा मनोज जरांगे पाटील हे उद्या सोमवार दि 04 मार्च 2024 रोजी नांदेड दौऱ्यावर येत आहेत.आमरण उपोषण तात्पुरतं स्थगित केल्यानंतर जरांगे पाटील यांनी संवाद दौरा आयोजित केला असुन दि 03 रोजी ते बीड, धाराशिवचा तर 04 मार्च रोजी दुपारर्यंत सोलापूर तर सायंकाळी नांदेड शहरात दाखल होणार आहेत.

मराठा आरक्षणाची पुढील रणणिती ठरवण्यासाठी ते नांदेड जिल्ह्यातील सकल मराठा समाज बांधवांसोबत "संवाद बैठक" घेणार असुन सदरील बैठकित ते समाजाला मार्गदर्शनपर संवाद साधण्यासाठी सायं 7.30 वाजताच्या सुमारास चांदोजी मंगल कार्यालय, कॅनल रोड नांदेड येथे उपस्थित राहणार आहेत.तत्पूर्वी ते देशमुख परिवाराच्या विवाह सोहळ्यास अर्धापूर रोड वरील विठ्ठलराव देशमुख मंगल कार्यालय येथे हजेरी लाऊन बैठकीला येतील. सदरील तातडीच्या आणि महत्वपूर्ण बैठकीला नांदेड जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील आणि गावा गावातील गरजवंत मराठ्यांनी मनोज जरांगे पाटील यांचे विचार ऐकण्यासाठी उपस्थित रहावे असे आवाहन सकल मराठा समाजाकडून मराठा सेवक श्याम पाटील वडजे यांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या