🌟स्त्रीरोग तज्ञ गावात आले बाई...तु तपासणी केली की नाही ?


🌟वाशिम जिल्ह्यातल्या सर्व शासकीय दवाखान्यामध्ये दर महिन्याच्या नऊ तारखेला स्त्रीरोग तज्ञ उपलब्ध राहणार🌟

वाशिम:-"वाचून दचकलात..? हो, हे खरेच आहे!"गरोदरपणात स्त्रीरोग तज्ञांकडून तपासणी करून घ्यावी असे सगळ्यांनाच वाटते.मात्र प्रत्येकालाच हे शक्य होते असे नाही. ग्रामीण भागातील महिलांना, समाजाच्या तळागाळातील महिलांना आजही दर महिन्याला स्त्रीरोग तज्ञांची सेवा मिळणे अनेक कारणांमुळे कठीण आहे. मात्र प्रधानमंत्री सुरक्षित अभियान अंतर्गत आता जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. आणि  मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे यांच्या आदेशाने वाशिम जिल्ह्यातल्या सर्व शासकीय दवाखान्यामध्ये दर महिन्याच्या नऊ तारखेला स्त्रीरोग तज्ञ उपलब्ध राहणार आहेत. त्यामुळे सर्व गरोदर मातांना आता गरोदरपणात दर महिन्याच्या 9 तारखेला स्त्रीरोग तज्ञांमार्फत आपली तपासणी करून घेता येणार आहे.

या दिवशी गरोदरपणात आवश्यक असणाऱ्या सर्व रक्ताच्या तपासण्या ,लघवी तपासण्या, व इतर तपासण्या सुद्धा केल्या जात आहेत .शिवाय एक सोनोग्राफी देखील आपल्या तालुक्याच्या ठिकाणी मोफत करण्यात येत आहे .या तपासणीनंतर ज्या मातांना अधिक उपचारांची आवश्यकता असेल,जसे रक्ताची कमतरता असणे,गरोदरपणातील मधुमेह ,रक्तदाब इत्यादी व याव्यतिरिक्त आजार ज्यांचा उपचार शासकीय दवाखान्यात प्राथमिक आरोग्य केंद्र,ग्रामीण रुग्णालय येथे होतो तो गरोदर मातांना मिळणार आहे. शिवाय यापेक्षा वेगळ्या उपचाराची आवश्यकता असल्यास सदर मातांना शासकीय वाहनाद्वारे जिल्हास्तरावर नेऊन आवश्यक त्या सर्व रक्ताच्या चाचण्या व उपचार मोफत केला जाणार आहे .त्यामुळे दर महिन्याच्या नऊ तारखेला होणाऱ्या प्रधानमंत्री सुरक्षित मातृत्व अभियानात आपण गरोदरपणातील आपल्या प्रत्येक महिन्याची तपासणी जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्रात  स्त्रीरोग तज्ञांमार्फत करून घ्यावी असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुहास कोरे यांनी केले आहे.


प्रतिनीधी:-फुलचंद भगत

मंगरुळपीर/वाशिम


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या