🌟नांदेड येथील नगिनाघाट परिसरातील जेष्ठ नागरिक जत्थेदार सरदार दर्शनसिघ गुरदीपसिंघ भट्टी यांचे दुःखद निधन....!


🌟त्यांच्या पार्थिवावर नगिनाघाट येथील स्मशानभूमीत सिख धार्मिक रितीरिवाजा प्रमाणे शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार🌟 

नांदेड : हुजूर साहीब नांदेड शहरातील नगिनाघाट परिसरातील जेष्ठ नागरिक तथा सिख धार्मिक साहित्याचे व्यापारी जत्थेदार सरदार दर्शनसिघ गुरदीपसिंघ भट्टी यांचे वयाच्या ७३ व्या वर्षी शुक्रवार दि.०१ मार्च २०२४ रोजी दुपारी ०२-०० वाजेच्या सुमारास हैदराबाद येथील खाजगी रुग्णालयात उपचारा दरम्यान दुःखद निधन झाले.

पंजाब राज्यातील गुरुदासपूर जिल्ह्यातल्या डेरा बाबा नानक तालुक्यातील जिवन नांगल या गावातील मुळचे रहिवासी असलेले जत्थेदार सरदार दर्शनसिघ गुरदीपसिंघ भट्टी हे धार्मिक सिख साहित्याचे व्यापारी होते जवळपास चार/साडेचार दशकांपूर्वी तख्त सचखंड हुजूर साहीब या पवित्र तिर्थक्षेत्रावरील श्रध्देपोटी येथे स्थायिक झाले होते अत्यंत धार्मिक व मनमिळाऊ प्रेमळ स्वभावाचे व्यक्तीमत्व म्हणून ते परिचित होते.

त्यांच्या पश्चात पत्नी सुरजीत कौर दर्शनसिंघ भट्टी यांच्यासह तीन मुलं स.हिरसिंघ दर्शनसिंघ भट्टी,स.हरपालसिंघ दर्शनसिंघ भट्टी,स.जसपालसिंघ दर्शनसिंघ भट्टी व तिन मुली राजविंदरकौर,कवलजीतकौर,अमनजीतकौर आठ नातवंड असा मोठा परिवार असून त्यांच्या पार्थिवावर नगिनाघाट येथील स्मशानभूमीत शनिवार दि.०२ मार्च २०२४ रोजी सिख धार्मिक रितीरिवाजा प्रमाणे मोठ्या जनसमुदाच्या उपस्थितीत शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार........ 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या