🌟क्षेत्र कोणतेही असो प्रत्येक ठिकाणी ग्रंथशास्त्र या विषयाचा अभ्यास आणि तांत्रिक ज्ञान असलेल्या व्यक्तींची गरज - डॉ.धर्मराज वीर


🌟स्वा.सै.सुर्यभानजी पवार महाविद्यालयात आयोजित ग्रंथपालन प्रमाणपत्र अभ्यासक्रम उद्घाटन सोहळ्या प्रसंगी ते म्हणाले🌟 


पुर्णा : पुर्णा शहरातील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त ग्रंथपालन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचा उद्घाटन सोहळा संपन्न झाला या कार्यक्रमाच्या उद्घाटन प्रसंगी बोलतांना डॉ.धर्मराज वीर म्हणाले की क्षेत्र कोणतेही असो प्रत्येक ठिकाणी ग्रंथशास्त्र या विषयाचा अभ्यास आणि तांत्रिक ज्ञान असलेल्या व्यक्तींची गरज असते म्हणून या विषयाशी संबंधित विविध अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी वळले पाहिजे असे मत त्यांनी व्यक्त केले. 

              महाराष्ट्र शासन मान्यता प्राप्त ग्रंथपालन प्रमाणपत्र अभ्यासक्रमाचे उद्घाटन सोहळा येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात संपन्न झाला यावेळी प्राचार्य डॉ.रामेश्वर पवार हे या उद्घाटन सोहळ्याच्या अध्यक्षस्थानी होते. कार्यशाळेचे उद्घाटन विद्यापीठाच्या ज्ञानस्त्रोत केंद्राचे माजी संचालक डॉ. धर्मराज वीर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे म्हणून प्राचार्य डॉ. विठ्ठल घुले, जिल्हा ग्रंथालय संघाचे सचिव जीवन लोखंडे, जिल्हा ग्रंथालय संघाचे उपाध्यक्ष विलास शिंदे,जिल्हा ग्रंथालय संघाचे सदस्य देविदास केजगीर,  जगदीश जोगदंड, संयोजक प्रा.दत्ता पवार उपस्थित होते.  विशेष उपस्थितात विद्यापीठ व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. सुरेखा भोसले, विद्यापीठ अधिसभा सदस्य डॉ. विजय भोपाळे यांच्यासह अभ्यास मंडळाचे सदस्य उपस्थित होते. यावेळी पुढे बोलताना डॉ. वीर म्हणाले, ग्रंथालय माहितीशास्त्राला सध्याच्या युगात प्रचंड संधी उपलब्ध असून निरनिराळ्या ठिकाणी  ग्रंथालय आणि ग्रंथपालांची गरज भासते. त्या अनुषंगाने ग्रंथपालन प्रमाणपत्र असे अभ्यासक्रम महत्त्वाचे वाटतात. वाचनातूनच अनेक व्यक्ती घडल्या. त्यांनीच राष्ट्र घडविले.  ग्रंथ हे जीवनातील आवश्यक अशी बाब आहे म्हणून ग्रंथालयाने संख्यात्मक ग्रंथसंपदा न वाढवता गुणात्मक ग्रंथसंपदा वाढवण्याकडे लक्ष देण्याची गरज आहे. ज्याच्या माध्यमातून ग्रंथालयाकडे येणाऱ्या वाचकांची संख्या ही वाढू शकेल आणि त्यांच्या ज्ञानामध्ये एक चांगल्या पद्धतीने भर पडू शकेल अशी भावना व्यक्त केली.

    क्षेत्र कोणतेही असो प्रत्येक ठिकाणी ग्रंथशास्त्र या विषयाचा अभ्यास आणि तांत्रिक ज्ञान असलेल्या व्यक्तींची गरज असते. म्हणून या विषयाशी संबंधित विविध अभ्यासक्रमाकडे विद्यार्थ्यांनी वळले पाहिजे. क्षेत्र कोणतेही असो या विषयांचे ज्ञान असलेल्या माणसाची त्या त्या ठिकाणी नितांत गरज असते असे मत प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार यांनी व्यक्त केले. यावेळी अध्यापक प्रा. डॉ. विलास काळे, संयोजक प्रा. दत्ता पवार, डॉ. अशोक कोलंबीकर यांचा डॉ. धर्मराज वीर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. प्रास्ताविक प्रा. दत्ता पवार यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. प्रभाकर किर्तनकार यांनी केले. आभार प्रदर्शन डॉ. अशोक कोलंबीकर यांनी केले. प्रमुख उपस्थितात दत्ता कदम, सूर्यकांत भोसले, रामेश्वर भाले, यादव कल्लाळीकर, ज्ञानोबा मुळे, ज्ञानोबा कदम यांचा समावेश होता.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या