🌟महिलांनी आर्थिक दृष्ट्या सक्षम बनले पाहिजे-- विद्या फुलवाडकर


🌟आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त लैंगिक छळ प्रतिबंधक व महिला तक्रार निवारण समितीच्या वतीने आयोजित कार्यक्रमात त्या म्हणाल्या🌟

पूर्णा (जं.) प्रतिनिधी - आजच्या काळात महिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहून आर्थिक दृष्ट्या सक्षम बनले पाहिजे असे प्रतिपादन महिला उद्योजक विद्या फुलवाडकर यांनी केले. 

त्या स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयातील  "आंतरराष्ट्रीय महिला दिनानिमित्त" लैंगिक छळ प्रतिबंधक व महिला तक्रार निवारण समितीच्या वतीने आयोजित " महिला आर्थिक सबलीकरण " या विषयावरील कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून बोलत होत्या.

पुढे बोलताना त्या म्हणाल्या की स्वत:चा उद्योग सुरु करण्यासाठी आवश्यक  ती कौशल्य आपण आत्मसात केली पाहिजेत.  यावेळी पलसिद्ध उद्योग समुहाचे सिद्धिविनायक फुलवाडकर यांनी युवक युवतींना डिजिटल मार्केटिंग आणि ऑनलाईन सर्व्हिसेस मध्ये उपलब्ध असलेल्या संधी विषयी सविस्तर मार्गदर्शन केले. 

या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. रामेश्वर पवार हे होते. तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक डाॅ. शारदा बंडे यांनी केले.या कार्यक्रमासाठी विचारमंचावर स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठाच्या व्यवस्थापन परिषद सदस्य डॉ. सुरेखा भोसले, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ.भीमराव मानकरे आदी मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ दिपमाला पाटोदे यांनी केले तर आभारप्रदर्शन प्रा. वैशाली लोणे यांनी मानले.  

या कार्यक्रमासाठी महाविद्यालय प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक ,कर्मचारी व विद्यार्थी यांनी मोठ्या प्रमाणात परिश्रम घेतले.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या