🌟महाराष्ट्र शासनाचा डॅा.बाबासाहेब आंबेडकर समाज भुषण पुरस्कार अल ईम्रान प्रतिष्ठानला प्रदान....!


🌟संस्थेचे सचिव ईम्रान खान यांना डॉ.बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले🌟


नांदेड : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने अल ईम्रान प्रतिष्ठान बिलोली या संस्थेस महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री आ.ना.एकनाथरावजी शिंदे,उपमुख्यमंञी आ.ना,अजितदादा पवार क्रिडामंञी आ.ना.संजयजी बनसोडे यांच्या हस्ते संस्थेचे सचिव ईम्रान खान यांना डाॕ.बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार देऊन गौरविण्यात आले.

 ◼️ समाज उत्थानाचे मौलीक कार्य करणारे हात पुढे यावेत पुढे आलेल्यांचा सन्मान व्हावा व पुढील पिढीला प्रेरणा मिळून नवीन समाजसेवक,संस्था तयार व्हावे या उदात्त हेतुने महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने दरवर्षी उत्कृष्ट कार्य  करणा-या संस्थाना डॉ बाबासाहेब आंबेडकर समाज  भुषण पुरस्कार दिले जाते.प्रशासनाकडून यावर्षी चार वर्ष चया पुरस्काराचे एकदाच वितरण करण्यात आले.सन २०२१-२०२२ या वर्षीचा डाॕ.बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय समाजभूषण पुरस्कार अल ईम्रान प्रतिष्ठान,बिलोली या संस्थेला (स्न्मानपञ,स्मृतीचिन्ह,शाल)  संस्थेचे अध्यक्ष प्रा.मोहसीन खान,सचिव ईम्रान खान यांना दि.१२ मार्च २०२४ रोजी मंगळवारी  नॕशनल सेंटर फाॕर परफाॕरमिंग आर्ट,नरीमन पाईंट मुंबई येथे महाराष्ट्र राज्याचे क्रिडामंञी ना.संजय बनसोडे व सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे सचिव सुमंत भांगे,आयुक्त ओमप्रकाश बकोरिया यांच्याहस्ते या पुरस्काराचे वितरण करण्यात आले.या पुरस्कार वितरण सोहळ्यास व्यासपिठावर राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे, उपमुख्यमंञी ना.अजित दादा पवार,आ.भरत गोगावले,आ.किशोर जोरगेवार,आ.म्हाञे आदि मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती.सदरिल कार्यक्रमाचे प्रास्ताविक सचिव सुमंत भांगे यांनी केले.तर सुञसंचलन मनाली सोनटक्के व आभार आयुक्त बकोरिया यांनी मानले.अल ईम्रान प्रतिष्ठानला मिळालेल्या पुरस्काराबद्दल खा.अशोकरावजी  चव्हाण,खा.प्रताप पाटील चिखलीकर,खा.हेमंत पाटील,खा.  अजित गोपछडे,आ.मोहन हंबर्डे,आ.बालाजी कल्याणकर,आ.राम पाटील रातोळीकर,आ.जितेश अंतापूरकर,माजी महापौर अब्दुल सत्तार,माजी नगरसेवक मसुद खान,समाज कल्याणचे सहायक आयुक्त शिवानंद मिनगिरे,निरिक्षक डी.जी,कादम,लिपिक के.बी.राठोड,आॕपरेटर रामदास पेंडकर यांच्यासह संपादक,पञकार बांधव यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या आहेत.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या