🌟नांदेड पोलीस दलाची कुख्यात गुंडा विरोधात एमपीडीए कायद्या अंतर्गत कारवाई....!


🌟छत्रपती संभाजीनगर मध्यवर्ती कारागृहात करण्यात आले स्थानबंध्द : वजीराबाद पोलीसांची तिसरी कार्यवाही🌟

नांदेड (दि.२९ मार्च) - नांदेड जिल्ह्याचे जिल्हा पोलिस अधिक्षक श्रीकृष्ण कोकाटे,अप्पर पोलिस अधिक्षक अबिनाश कुमार, उपविभागीय पोलीस अधिकारी सुशीलकुमार नायक उप विभाग ईतवारा नांदेड यांनी नांदेड जिल्ह्यातील गुन्हेगारी कृत्यांना आळा घालण्यासाठी मोक्का,एमपीडीए हदपारी सारख्या विविध प्रकारच्या प्रतिबंधक कारवाया करण्याच्या सुचना शहरासह जिल्ह्यातील सर्व पोलीस स्थानकांना दिल्या आहेत. 


नांदेड पोलीस दलातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे शहरातील वजीराबाद पोलीस प्रशासनाकडून कुख्यात गुंड ईश्वरसिंघ जसवंतसिंघ गिरणीवाले राहणार चिखलवाडी कॉर्नर नांदेड,मिर्झा शब्बीर बेग मिर्झा गफ्फार बेग राहणार खडकपूरा नांदेड यांच्या विरोधात एमपीडीए. कायद्या अंतर्गत कारवाही करण्यात आली. ज्यामध्ये मा. जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी नांदेड यांनी प्रस्तावाचे अवलोकन करुन सदर गुन्हेगारांविरुध्द स्थानवध्दतेचे आदेश निर्गमीत केले असल्याने सदर गुन्हेगारांना छत्रपती संमाजी नगर येथील मध्यवर्ती कारागृहात स्थानबद्ध करण्यात आले आहे. 

वरीष्ठांच्या सुचनांप्रमाणे पोलीस निरीक्षक परमेश्वर कदम,सहाय्यक पोलीस निरीक्षक आर.डी.वटाणे यांनी वरीष्ठांनी दिलेल्या सुचनांप्रमाणे पोलीस स्थानक वजीराबाद नांदेड येथील अभिलेखावरील क्रियाशिल गुंड मिर्झा शब्बीर बेग मिर्झा गफ्फार बेग वय 34 वर्ष व्यवसाय बेकार हा खडकपूरा नांदेड याचा अभिलेख पाहणी केला असता त्याचे विरुध्द बेकायदेशिररित्या स्वतः जवळ शस्त्र बाळगणे,दंगा करणे,सरकारी नौकरांवर हल्ले करणे,खंडणीची मागणी करणे,खंडणी न दिल्यास जिवे मारण्याचा प्रयत्न करणे, साधी व गंभीर दुखापत करणे,चोरी व जबरी चोऱ्या करणे,रात्री अपरात्री चोरी करण्याचे उद्देशाने फिरणे अशा विविध स्वरुपाचे गुन्हे असल्याचा अभिलेख आढळून आला सदर गुन्हेगारांकडुन वारंवार गुन्हे घड़ुन नेहमी कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन सामाजीक सुव्यवस्था धोक्यात येत असल्याचे लक्षात आल्याने त्याचेविरुध्द महाराष्ट्र झोपडपट्टी गुंड,हातमट्टीवाले,औषधीद्रव्य विषयक गुन्हेगार धोकादायक व्यक्ती,द्रकश्राव्य कलाकृतीचे विनापरवाना प्रदर्शन करणाऱ्या व्यक्ती (व्हीडीओ पायरेट्स) वाळू तस्कर आणि अत्यावश्यक वस्तुंचा काळा बाजार करणाऱ्या व्यक्ती यांच्या विधातक कृत्यांना आळा घालण्या बाबतचा अधिनियम 1981 (सुधारणा 2015) चे कलम 3 (1) (|॥70/) अन्यये प्रस्ताव मा. पोलीस अधिक्षक नांदेड यांचे मार्फतीने मा.जिल्हाधीकारी तथा जिल्हादंडाधिकारी, नांदेड यांचेकडे पाठविण्यात आला...... 

मा.जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, नांदेड यांनी प्रस्तवाचे अवलोकन करुन यातील गुन्हेगाराविरुध्द दाखल गुन्हयांचा अभिलेख पाहुन त्यास नमुद कायसद्यान्वये स्थानबध्द करुन मध्यवर्ती कारागृह छत्रपती संभाजीनगर याठीकाणी दाखल करण्याचे आदेश निर्गमीत केले. सदर आदेशाप्रमाणे परमेश्वर कदम, पोलीस निरीक्षक, आर.डी. वटाणे, सहा,पोलीस निरीक्षक, बालाजी किरवले, पोउपनि तसेच पोलीस अंमलदार दत्तराम जाधव, मनोज परदेशी, शरदचंद्र चावरे, रमेश सुर्यवंशी, बालाजी कदम, अंकुश पवार, भाऊसाहेब राठोड, मेघराज पुरी, शेख ईप्रान यांनी नमुद कम ईसम यास ताब्यात घेऊन त्यास मध्यवर्ती कारागृह छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी स्थानबध्द केले आहे.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या