🌟सराफ व्यावसायिकांच्या सुरक्षेबाबत दक्षता समिती नेमण्याबाबत अध्यादेश जारी.....!


🌟राज्याचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री देवेंद्र फडणवीस आणि सौ.चित्राताई वाघ यांचे सोनार समाजातर्फे आभार🌟


नाशिक (प्रतिनिधी) - सोनार सराफ व्यावसायिकांच्या सुरक्षेबाबत भादंवि ४११ पासून दिलासा देणारा सुधारित अध्यादेश जारी केल्याबद्दल महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री तथा गृहमंत्री ना. देवेंद्र जी फडणवीस यांचे आणि यासंदर्भात सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या ज्येष्ठ सोनार समाजसेविका तथा भाजप महिला प्रदेशाध्यक्ष सौ. चित्राताई किशोर वाघ यांचे ऑल इंडिया सोनार फेडरेशन,सकल भारतीय सोनार समाज संघटन,महाराष्ट्रातील सराफ व्यावसायिक संघटना,सेतुबंधन मध्ये समाविष्ट असलेल्या विविध सोनार समाज संस्था आणि संघटना यांच्यातर्फे तसेच महाराष्ट्रातील सर्व शाखीय सोनार समाजातर्फे आभार मानण्यात येत आहेत. नवीन अध्यादेशामुळे महाराष्ट्रातील सोनार सराफ व्यावसायिकांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.


महाराष्ट्र राज्यातील सराफी व्यवसाय करणाऱ्या सोनार समाज बांधवांसाठी महाराष्ट्र शासनाच्या गृह विभागाने महाराष्ट्रातील सराफी व्यावसायिकांच्या सुरक्षेबाबत दक्षता समिती नियुक्ती करण्या संदर्भात आणि कलम ४११ पासून दिलासा देणारा अध्यादेश नुकताच जारी केला आहे. याप्रकरणी ज्येष्ठ सोनार समाजसेविका आणि भाजप महिला प्रदेशाध्यक्ष सौ.चित्राताई किशोर वाघ यांनी महाराष्ट्रातील सराफी व्यवसाय करणाऱ्या सोनार समाज बांधवांनी कलम ४११ चे धसक्याने तसेच त्यामुळे होणाऱ्या कारवाईतून आत्महत्या करण्याच्या दुर्दैवी घटना गतवर्षी घडल्या होत्या. या पार्श्वभूमीवर ऑल इंडिया सोनार फेडरेशनसह विविध सोनार समाज संस्था आणि संघटना यांच्यातर्फे निवेदने देण्यात आली. दिनांक १ ते ७ डिसेंबर २०२३ दरम्यान सकल भारतीय सोनार समाज संघटनेने ऑल इंडिया सोनार फेडरेशनचे सहकार्याने आणि सेतुबंधन मधील विविध सोनार समाज संस्था आणि संघटना एक अनोखा राष्ट्रीय सोनार समाज जागृती सप्ताह पाळण्यात आला.


या सर्व बाबींची दखल घेऊन ज्येष्ठ सोनार समाजसेविका सौ. चित्राताई वाघ यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री, गृहमंत्री ना. देवेंद्र जी फडणवीस यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला. सौ चित्राताई यांनी पाठपुरावा करताना चमकोगिरी केली नाही. त्यांनी पीडित सोनार सराफ व्यावसायिकांच्या कुटुंबीयांना प्रत्यक्ष भेटून दिलासादेखील दिला.  अध्यादेश जारी केल्याबद्दल ना. देवेंद्र जी फडणवीस आणि सातत्याने पाठपुरावा करणाऱ्या सौ.चित्राताई वाघ यांचे ऑल इंडिया सोनार फेडरेशन,सकल भारतीय सोनार समाज संघटन* आणि *सेतुबंधन* मधील विविध सोनार समाज संस्था आणि संघटना यांच्यातर्फे तसेच महाराष्ट्रातील सर्व शाखीय सोनार समाज बांधव आणि भगिनी यांच्यातर्फे आभार मानण्यात येत आहे सराफ  व्यावसायिकांच्या सुरक्षेबाबतच्या समस्यांचे निराकरण करण्यासाठी राज्याचे उपमुख्यमंत्री ना. देवेंद्रजी फडणवीस यांनी नुकतेच नविन परिपत्रक जारी केले आहे.

सोनार सराफ बांधवांना अतिशय जाचक असणाऱ्या भादंवि ४११ च्या त्रासामुळे अनेक सोनार सराफ व्यापाऱ्यांनी आत्महत्या केल्या. स्वत:ला संपवले.आता निर्दोष सराफ व्यापाऱ्यांना त्रास होऊ नये तसेच आरोपीलाच शिक्षा व्हावी, या दृष्टिकोनातूनच नवीन मार्गदर्शक परिपत्रक काढण्यात आले आहे या परिपत्रकात सराफ व्यावसायिकांकडून चोरीची किंवा संशयित मालमत्ता जप्त करताना पाळावयाची मार्गदर्शक तत्वे तसेच सराफांच्या अडचणी सोडवण्यासाठी त्यांच्या मदतीला राज्यस्तरावर दक्षता समिती स्थापन करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. 

🔴...आता रिकव्हरी अधिकारी नाही तर इनव्हेस्टिगेशन अधिकारी असणार आहे :-


महाराष्ट्रातील सोनार सराफ बांधवांसाठी ही अत्यंत दिलासा देणारी बाब आहे, याबद्दल सौ. चित्राताई वाघ यांनीदेखील व्यक्तिशः तसेच महाराष्ट्रातील सर्व शाखीय सोनार समाजातर्फे ना. देवेंद्र जी फडणवीस यांचे आभार मानले आहेत ज्येष्ठ सोनार समाजसेविका सौ.चित्राताई किशोर वाघ यांचा सकल भारतीय सोनार समाज संघटन आणि सेतुबंधन मध्ये समाविष्ट असलेल्या विविध सोनार समाज संस्था आणि संघटना यांना सार्थ अभिमान वाटतो, अशी माहिती सकल भारतीय सोनार समाज संघटनेचे संस्थापक श्री. मिलिंदकुमार सोनार यांनी दिली.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या