🌟जागतिक महिला दिनानिमित्त परभणीतील कर्तृत्ववान महिलांचा 'इरा' व 'महिला उन्नती संस्थे' तर्फे सन्मान....!


🌟यावेळी कर्तबगार मान्यवर महिलांचा करण्यात आला सत्कार🌟 

परभणी - जागतिक महिला दिनानिमित्त , महिला उन्नती संस्था (भारत) व इंडियन रिपोर्ट्स असोसिएशन च्या वतीने संपूर्ण देशात राबविण्यात येत असलेल्या महिला सक्षक्तिकरण अभियानाअंतर्गत, परभणी मधील महिलांचे प्रश्न निवारणासाठी उभारण्यात आलेल्या चळवळीस साथ देवुन संपूर्ण जीवन समाजहितासाठी अर्पित केलेल्या परभणी मधील आपल्या कारकीर्दीत उत्कृष्ट कामगिरी बजावणाऱ्या ज्येष्ठ महिला व धडाडीने कर्तबगारी बजावत सर्व क्षेत्रात आपल्या कामगिरीने उत्तुंग शिखर गाठणाऱ्या महिलांना पुष्पगुच्छ ,प्रशस्तीपत्र व सन्मानपत्र देऊन गौरविण्यात आले आहे.

त्यामध्ये धडाडीच्या सामाजिक कार्यकर्त्या ॲड.माधुरी क्षीरसागर , सुप्रसिद्ध स्त्री रोगतज्ञ तथा सामाजिक कार्यकर्त्या डॉ.सालेहा कौसर,ज्येष्ठ नेत्या मल्लिका गफार,ज्येष्ठ सामाजिक नेत्या राणूबाई वायवळ ,स्वातंत्र्य सैनिक पत्नी ,समाजसेविका शशिकलाबाई दौलतराव मोरे ,समाजसेविका लक्ष्मी मारोतराव गायकवाड ,पत्रकार व उद्योजक सुनिता अंगदराव मोरे ,आदर्श समाजसेविका कमलबाई गिरमाजी गायकवाड ,सुमित्रा लझडे यांचा , महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष संजय कुमार कोटेचा यांचे मार्गदर्शना खालील इंडियन रिपोर्ट्स असोसिएशन व महिला उन्नती संस्थेच्या महाराष्ट्र प्रदेश अध्यक्षा श्रीदेवी पाटील यांच्या वतीने पुष्पगुच्छ ,' प्रशस्तीपत्र ' व ' सम्मानपत्र ' मराठवाडा विभागीय अध्यक्ष मदन (बापू) कोल्हे ,

मराठवाडा विभागीय पी.आर.ओ.तथा माजी विशेष कार्यकारी अधिकारी, वैभव ज्वाला चे संपादक देवानंद वाकळे तसेच शैक्षणिक क्षेत्रामध्ये सेवा बजावत पत्रकारितेसोबत सामाजिक व राजकीय, धार्मिक कार्यात सदा अग्रेसर असलेले आदर्श शिक्षक राजकुमार एंगडे, इरा चे फोटो ग्राफर जिल्हा अध्यक्ष संजय घनसावंत यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.ठिकठिकाणी झालेल्या या गौरव समारंभ प्रसंगी वैभव ज्वाला चे प्रतिनिधी सारीपुत्र वाकळे यांचेसह नागरिक व महिलांची उपस्थिती लाभली होती.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या