🌟पुर्णा तालुक्यातील ममदापूर,कंठेश्वर,पिंपळा लोखंडे येथे उद्या हभप.अच्युत महाराज दस्तापुरकर यांचे हरिकीर्तन.....!


🌟यावेळी तिनही गावातील ग्रामस्थांनी किर्तन सोहळ्यास जास्तीतजास्त संख्येने उपस्थित राहून महाप्रसादाचा लाभ घ्यावा🌟 

पुर्णा (दि.२८ मार्च) - पुर्णा तालुक्यातील ममदापूर येथे उद्या शुक्रवार दि.२९ मार्च २०२४ रोजी गेल्या सात दिवसापासून अखंड हरिनाम सप्ताह चालू असून त्या सप्ताहामध्ये दुपारी ०२-०० ते ०४-०० वाजता पूजेचे किर्तन गुरुवर्य हभप.अच्युत महाराज दस्तापुरकर यांचे होईल व नंतर भक्तांसाठी महाप्रसाद होईल तर कंठेश्वर येथे महादेव मंदिर अभिषेक व आई वडिलांच्या कृतज्ञता सोहळा या निमित्ताने व दुपारी ०३-०० ते ०६-०० भक्तांसाठी महाप्रसाद होईल, व तसेच महंत जीवनदासजी महाराज चुडावेकर,दिपक महाराज पांगरेकर,ज्येष्ठ समाजसेवक डॉ दत्तात्रय वाघमारे यांची उपस्थिती राहील व सायंकाळी ०६-०० ते ०८-०० वाजेपर्यंत हभप. अच्युत महाराज दस्तापुरकर यांचे हरिकीर्तन होईल व रात्री ०९-०० ते ११-०० वाजेपर्यंत पिंपळा लोखंडे येथे नाथ षष्ठी निमित्त अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे सहाव्या दिवसाची किर्तन सेवा हभप.अच्युत महाराज दस्तापुरकर यांचे होईल तरी या किर्तन श्रवणसाठी उपस्थित राहून महाप्रसादाचा पंचक्रोशीतील भाविकांनी लाभ घ्यावा असे आवाहन ममदापूर,कंठेश्वर,पिंपळा लोखंडे येथील ग्रामस्थांनी केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या