🌟पुर्णेतील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात कार्यरत अंशकालीन पदवीधर शिक्षिकेची मानसिक आर्थिक छळवणूक...!


🌟जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे निराधार असाह्य शिक्षिकेची न्यायासाठी निवेदनाद्वारे अनेकवेळा याचना🌟

परभणी/पुर्णा (दि.१८ मार्च) - परभणी जिल्ह्यातल्या पुर्णा शहरातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात कार्यरत अंशकालीन पदवीधर शिक्षिकेची मुख्याध्यापक तसेच लेखापाल व गट शिक्षण अधिकारी यांच्याकडून सतत मानसिक आर्थिक छळवणूक होत असल्याचा गंभीर समोर आला असून सदरील निराधार असाह्य विधवा पदवीधर अंशकालीन शिक्षिकेच्या हक्काचे मानधन तिला वेळेवर न देता मागील तिन महिन्यांपासून रोखण्यात आल्याने तिच्यावर अक्षरशः उपासमारीची वेळ आली असून अशा प्रकारे मागील अनेक वर्षांपासून त्या अबलेचा मानसिक आर्थिक छळ होत असल्याने तिचे मानसिक खच्चीकरण करुन तिला नौकरी सोडून पळून जाण्यास भाग पाडून तिच्या जागेवर दुसऱ्या एखाद्याची भरती करण्याचा कट तर संबंधित अधिकारी रचत नाहीत ना ? असा प्रश्न होत आहे.

पुर्णा शहरातील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात कार्यरत अंशकालीन पदवीधर शिक्षिका श्रीमती सिमा प्रभाकरराव फुटाणे या सेलू येथील रहिवासी असून त्यांचे शिक्षण बिएससी/बिड मेथड गणित/विज्ञान असे असून त्यांना दि.०२ मार्च २०१९ च्या शासन निर्णयानुसार त्यांना पदवीधर अंशकालीन उमेदवारामधून पवित्र पोर्टलच्या माध्यमातून कायम शासकीय नौकरीत समावेश करणे आवश्यक असतांना देखील व तत्कालीन जिल्हाधिकारी व निवासी उपजिल्हाधिकारी परभणी यांच्याकडे लेखी अर्ज केल्यानंतर त्यांच्या कारवाई नुसार मा.आयुक्त मानव विकास आयुक्तालय औरंगाबाद यांचे अध्यक्षतेखाली दि.२०/०९/२०२२ रोजी झालेल्या आढावा बैठकीतील सुचना व मा.शिक्षणाधिकारी (प्राथमिक) जिल्हा परिषद परभणी यांचे दि.२२/०९/२०२२ रोजीच्या तोंडीं आदेश नंतर त्यांचा शैक्षणिक पात्रते अनुसार पदवीधर अंशकालीन म्हणून कायम शासकीय नौकरीत समावेश करणे आवश्यक होते किंवा तत्कालीन निवासी उपजिल्हाधिकारी महेश वडदकर यांनी सहाय्यक संचालक जिल्हा कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र परभणी यांना दि.१७/०२/२०२२ रोजी पाठवलेलं पत्र तसेच सहाय्यक आयुक्त कौशल्य विकास रोजगार व उद्योजकता परभणी यांच्या पत्र व्यवहारा अनुसार संबंधित अंशकालीन पदवीधर शिक्षिका श्रीमती सिमा प्रभाकरराव फुटाणे यांची तासिका तत्त्वावर गणित या विषयासाठी पुर्णेतील कस्तुरबा गांधी बालिका विद्यालयात नियुक्ती करणे आवश्यक असतांना गटशिक्षणाधिकारी कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय तालुका व्यवस्थापन समिती पुर्णा व अध्यक्ष तथा तहसीलदार कस्तुरबा गांधी बालिका विद्यालय तालुका व्यवस्थापन समिती पुर्णा यांनी दि.२३/०९/२०२२ रोजी नमूद असहाय्य निराधार अंशकालीन पदवीधर शिक्षिका श्रीमती सिमा प्रभाकरराव फुटाणे यांची पुर्णवेळ शिक्षिका तसेच अटी व शर्तीच्या अधीन राहून निव्वळ तात्पुरत्या स्वरूपात विज्ञान विषय या पदावर नियुक्ती केली खरी परंतु भविष्यात नमूद शिक्षिकेला केव्हाही काढता येवून तिच्या जागेवर हितसंबंध जोपासत आणखी कोणाची भरती करण्याचा कुटील डाव रचत तब्बल जाचक व नियमबाह्य दहा अटींवर तिची नेमणूक करण्यात आली असून सुरुवातीपासूनच संबंधित असहाय्य निराधार अंशकालीन पदवीधर शिक्षिकेची मानसिक आर्थिक छळवणूक होत असल्याचा गंभीर प्रकार यांवरून निदर्शनास येतो संबंधित शिक्षिकेचे मानधन तासिका तत्त्वावर २३,१००/-रुपये प्रती महिना काढने बंधनकारक असतांना देखील तिला तिचे हक्काचे मानधन वेळेवर दिले जात नाही अन्य शिक्षक कर्मचाऱ्यांच्या तुलनेत नमूद शिक्षिका इमानेइतबारे कर्तव्य बजावत असतांना व आपल्या विज्ञान विषयाचा १०० टक्के निकाल लावत असतांना देखील या शाळेतील मुख्याध्यापिका राऊत क्लार्क वैद्य व अनेक तक्रारी नंतर देखील संबंधितांना पाठीशी घालणारे गटशिक्षणाधिकारी सुर्यवंशी हैं मानसिक आर्थिक छळवणूक करीत असल्यामुळे त्यांनी परभणीचे जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्यासह जिल्हा शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद परभणी यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे रितसर तक्रार दाखल केली आहे.....टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या