🌟पुर्णेतील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात महान क्रांतिकारक राष्ट्रभक्त शहीद भगतसिंग यांचा स्मृतिदिन साजरा...!


🌟याप्रसंगी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ.पी.डी.सूर्यवंशी यांची प्रमुख उपस्थिती🌟

पुर्णा (दि.२३ मार्च ) - येथील स्वातंत्र्यसैनिक सूर्यभानजी पवार महाविद्यालयात दिनांक २३ मार्च २०२४ रोजी भारतीय स्वातंत्र्यासाठी आपले बलिदान देणारे महान क्रांतिकारक शहीद भगतसिंग यांचा स्मृतिदिन साजरा करण्यात आला.  महाविद्यालयाच्या वतीने अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे समन्वयक डॉ. भीमराव मानकरे यांच्या हस्ते प्रखर राष्ट्रभक्त शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

याप्रसंगी महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रमाधिकारी प्रा.डॉ. पी.डी.सूर्यवंशी, क्रीडा संचालक डॉ भारत चापके, प्रसिद्ध विभाग समन्वयक प्रा डॉ संजय कसाब, सिनेट सदस्य प्रा डॉ विजय भोपाळे, डॉ.संतोष कुऱ्हे, मुख्य वरिष्ठ लिपिक माणिक कदम यांनी राष्ट्रभक्त शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेस  पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले . या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.डॉ.दीपमाला पाटोदे यांनी केले तर आभार प्रा. डॉ.प्रकाश सूर्यवंशी यांनी मानले.

यावेळी महाविद्यालयातील  प्राध्यापक ,कर्मचारी व विद्यार्थी यांनी शहीद भगतसिंग यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन केले या कार्यक्रमांसाठी महाविद्यालयातील प्राध्यापक, कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या