🌟परभणी लोकसभेसाठी अपक्ष उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांचे कडून एक उमेदवारी अर्जाची खरेदी....!


🌟यावेळी त्यांच्या समवेत सहकारी कार्यकर्ते हितचिंतक उपस्थित होते🌟 

परभणी (दि.२८ मार्च) : परभणी लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी मागील पाच वर्षापासून तयारी करत असलेले अपक्ष उमेदवार सखाराम बोबडे पडेगावकर यांनी आज गुरूवार दि.२८ मार्च रोजी परभणी जिल्हा अधिकारी कार्यालयात अपक्ष म्हणून उमेदवारी अर्ज खरेदी केला.

शेतकरी, मेंढपाळ कुटुंबात जन्म घेतलेले सखाराम बोबडे पडेगावकर यांनी मागची 2019 ची लोकसभा निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. यात त्यांना सतरा उमेदवारापैकी सहाव्या क्रमांकाची 6185 अशी मते मिळाली. 2019 च्या निवडणुकीच्या निकालानंतर सखाराम बोबडे पडेगावकर यांनी आपल्या कामाचा धडाका सुरू ठेवला. शेतकरी, मेंढपाळ, कष्टकरी, मजूर, विद्यार्थी सर्व वर्गातील लोकांना त्यांनी मदत केलेली आहे. या कामाच्या जोरावर 2024 ची निवडणूक लढवणार असे त्यांनी यापूर्वीच सांगितलेले होते .आज दिनांक 28 मार्च रोजी परभणी जिल्हाधिकारी कार्यालयातील निवडणूक कक्षात त्यांनी आपला उमेदवारी अर्ज खरेदी केला. या अर्जात ते अपक्ष म्हणून निवडणूक लढवणार असल्याचे उल्लेख केलेला आहे. यावेळी धनगर साम्राज्य सेनेचे महाराष्ट्र संपर्कप्रमुख रविकांत हरकळ , अकोल्याचे उमेदवार संदीप गवई, डॉक्टर छगन पांचाळ आदीसह सहकारी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या