🌟आपण पक्षात राहतो की नाही याबद्दल राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांना सातत्याने संशय...!

🌟लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर आयोजित  विजय निर्धार मेळाव्याप्रसंगी आ.डॉ.रत्नाकर गुट्टे यांचे विधान🌟 


परभणी (दि.11 मार्च) :  आपण पक्षात राहतो की नाही याबद्दल राष्ट्रीय समाज पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांना सातत्याने संशय राहीला आहे अशी खंत या पक्षाचे माजी प्रदेशाध्यक्ष तथा आमदार डॉ. रत्नाकर गुट्टे यांनी व्यक्त केली लोकसभा निवडणूकीच्या पार्श्‍वभूमीवर राष्ट्रीय समाज पक्षाने आयोजित केलेल्या विजय निर्धार मेळाव्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी पक्षाचे संस्थापक अध्यक्ष महादेव जानकर यांच्यासह अन्य वरिष्ठ नेतेमंडळी व्यासपीठावर विराजमान होती.

            याप्रसंगी या पक्षाचे एकमेव आमदार या नात्याने डॉ. गुट्टे यांनी आपल्या भाषणातून परखड मते व्यक्त केली. विशेषतः आपण या पक्षात राहतो की, नाही या बद्दल जानकर साहेबांना आपर्यंत संशय राहिला आहे, अशी खंत व्यक्त केली. गंगाखेड विधानसभा मतदारसंघात पंचायत समिती, कृषि उत्पन्न बाजार समितीत आपण ज्येष्ठ नेते कै. गोपिनाथराव मुंडे यांच्या प्रमाणे जादुची कांडी फिरवून सत्ता हस्तगत केली. दुर्देवाने पक्षाचे नेते या नात्याने जानकर यांनी आपणास कधीही कौतूकाचा फोन केला नाही, अशीही खंत व्यक्त केली. आपण या पक्षाचे कार्यकर्ते आहोत, इनामे इतबारे काम करीत आलो आहोत, आजही सोबत आहोत, भविष्यातही सोबत राहू, परंतु, नेतेमंडळींनीसुध्दा कार्यकर्त्याच्या पाठीवर थाप मारली पाहिजे, कौतूकाचे शब्द बोलले पाहिजेत, असे गुट्टे यांनी जानकर यांच्या समक्ष नमूद केले. परभणी लोकसभा मतदारसंघावर आपला हक्क आहे. तो निश्‍चितच रास्त आहे. त्यामुळे परभणीची जागा सोडवून घेण्या संदर्भात सर्वार्थाने प्रयत्न केले पाहिजेत. जागा न सुटल्यास आपण जनतेबरोबर विचार विनिमय करीत पुढील निर्णय घेतला पाहिजे, अशी अपेक्षाही गुट्टे यांनी व्यक्त केली......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या