🌟परभणी जागतिक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन.....!


🌟या कार्यक्रमात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी कविता नावंदे यांनी केले🌟

परभणी (दि.०१ मार्च) :  जिल्हा प्रशासन,जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय तथा जिल्हा परिषद शिक्षण विभागाच्या संयुक्त विद्यमाने  जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हा प्रशासन व जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालयाच्या वतीने महिला व मुलींसाठी विविध उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात जास्तीत जास्त महिलांनी सहभागी होण्याचे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती कविता नावंदे यांनी केले आहे.  

            दि. 8 मार्च रोजी सकाळी 7 वाजता खास महिला व युवतीसाठी दुचाकी मोटार वाहनाच्या रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे. शहराच्या मुख्य रस्त्यावरुन रॅली फिरणार आहे. रॅलीमध्ये सहभागी होणाऱ्या महाविद्यालय, उच्च माध्यमिक विद्यालय, सेवाभावी संस्था, क्रीडा संघटना यांच्या एका संघाना प्रवेश देण्यात येणार असून 25 ते 30 महिला किंवा युवतीचा संघ सहभागी होवू शकतो. सहभागी संघांनी सामाजिक संदेश देत रॅलीत सहभाग नोंदवावा. उत्कृष्ठ सामाजिक संदेश देणाऱ्या, रॅलीत संघ एकता, शिस्तबद्धता, वेशभूषा आदि बाबींचे निरीक्षण करून गुणदान करण्यात येईल आणि पहिल्या तीन संघाना सन्मानित करण्यात येईल.

            दुचाकी मोटार वाहन रॅलीची सुरुवात वसंतराव नाईक कृषी विद्यापीठ, काळी कमान वसमत रोड, श्री शिवाजी महाराज पुतळा, रेल्वे स्टेशन, बसस्टॅन्ड, उड्डाणपुल, जिंतुर रोड मार्गे जांब नाका, सरकारी दवाखाना, शिवाजी चौक, गुजरी बाजार मार्ग गांधी पार्क, नारायणचाळ, महात्मा ज्योतीबा फुले पुतळा मार्गे जिल्हा क्रीडा संकुल येथे रॅलीचा समारोप होईल. त्याप्रसंगी जिल्ह्यातील विशेष प्राविण्य प्राप्त केलेल्या महिलांचा सन्मान करण्यात येणार आहे.        

         याच दिवशी विविध क्रीडा संघटनाच्या वतीने महिलांच्या क्रीडा स्पर्धा जिल्हा क्रीडा संकुल येथे घेण्यात येणार आहेत. तसेच शिवाजी महाविद्यालयाच्या मैदानावर सकाळी 7 वाजता महिला व युवतीसाठी चालण्याची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, 50 वर्षावरील महिला 1 कि. मी. चालणे 50 वर्षाखालील युवती व महिलांसाठी 2 कि. मी. स्पर्धेचे आयोजन करण्यात आले असून, दोन्ही गटातील ‍विजेता पाहिल्या तीन स्पर्धकांना सन्मानचिन्ह व प्रमाणपत्र देवून जिल्हा प्रशासनाच्यावतीने गौरविण्यात येईल. यामध्ये जिल्ह्यातील कुठलीही महिला, महिला मंडळ, संघटना, शासकीय, निमशासकीय महिला सहभाग घेऊ शकतात.

            दुचाकी मोटार वाहन रॅली आणि चालण्याच्या स्पर्धेचे बक्षीस ‍वितरण  जिल्हा क्रीडा संकुल येथे होणार आहे. अधिक माहिती करीताराज्य क्रीडा मार्गदर्शक संजय मुंढे -9422178009, प्रकाश पंडित 8788525374, धिरज नाईकवाडे 9175817831 यांच्याशी दि. 6 मार्च 2024पर्यंत कार्यालयीन वेळेत नाव नोंदणी करण्याचे आवाहन  जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीमती कविता नावंदे यांनी केले आहे......                                

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या