🌟पुर्णेतील डॉ.आबेडकर रोड व टिळक रोडवरील देशी/विदेशी दारू दुकानदारांना वंचित बहुजन युवा आघाडीचा दणका....!


🌟वंचित बहुजन युवा आघाडीचे जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड यांच्या तक्रारीवरून दोन्ही दुकान इतरत्र स्थलांतरित करण्याचे आदेश🌟


परभणी/पुर्णा : पुर्णा शहरातील डॉ बाबासाहेब आंबेडकर रोडवरील में.जयस्वाल वाईन शॉप व लोकमान्य टिळक रोडवरील वसंतलाल जयस्वाल यांचे देशी दारू दुकान तात्काळ हटवण्यात यावे याकरिता परभणी जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक यांच्याकडे वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड यांनी दि.११ डिसेंबर २०२४ रोजी लेखी स्वरूपात तक्रार दिली होती या तक्रारीची दखल घेऊन परभणी जिल्हा राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिक्षक गणेश द.पाटील यांनी दि.२० डिसेंबर २०२३ रोजी आदेश क्रमांक डिईटी ११२०२३/२४७४/अधी/१४६२ अन्वये राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक परभणी यांच्या नावे आदेश पारित करुन पुढील योग्य त्या कार्यवाहीसाठी अग्रेशीत करुन में जयस्वाल वाईन शॉप डॉ बाबासाहेब आंबेडकर रोड पुर्णा येथील एफ एफएल-२ नंबर ०७/२०२१-२६ व सीएल-३ क्रमांक १५/२०२०-२१ चे स्थलांतर करणे बाबतच्या तक्रारी संदर्भात उल्लेख करीत सदरील दोन्ही दुकान विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ असल्याने धार्मिक भावना दुखावल्या जात असल्याचे तसेच दोन्ही दुकान रहदारीच्या ठिकाणी असल्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या महिला विद्यार्थी/विद्यार्थीनी,जेष्ठ नागरिक,अपंग यांना अडचणीचे ठरत असल्याने सदर प्रकरणी सखोल चौकशी करून त्याबाबतचा वस्तुनिष्ठ अहवाल तात्काळ सादर करण्याचे देखील आदेशात नमूद केले होते या संदर्भात अहवाल प्राप्त झाल्यानंतर सदरील देशी/विदेशी दारू दुकान स्थलांतरित करण्याचे आदेश निघाल्यानंतर यातील में जयस्वाल वाईन शॉप रेल्वे स्थानक परिसरातील श्रध्दा बिअर बार येथे स्थलांतरित करण्यात आले असून लोकमान्य टिळक रोडवरील वसंतलाल जयस्वाल देशी दारू दुकान देखील लवकरच स्थलांतरित होणार असल्याचे समजते.


परभणी जिल्हा वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड यांनी जनहीताशी बांधिलकी जोपासत संबंधित दारु दुकान हटवण्या संदर्भात दिलेल्या तक्रारीला यश मिळाले असल्यामुळे युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड यांचे परिसरातील नागरिकांनी अभिनंदन केले असून अश्या तरुण तडफदार नेतृत्वाची आज समाजाला आवश्यकता असल्याचे देखील नागरिकांनी बोलून दाखवले आहे......

--------------------------------------------------------

🌟'जो मै बोलता हु वही मै करता हु' - तुषार गायकवाड युवा जिल्हाध्यक्ष


पुर्णा शहरातील अनेक वर्षांपासून डॉ बाबासाहेब आंबेडकर रोड वरील वाईन शॉप व लोकमान्य टिळक रोडवरील दारू अड्डयामुळे या परिसरातून येणाऱ्या जाणाऱ्या विद्यार्थी/विद्यार्थींना नागरिकांना महिलांना होत असलेल्या नाहक त्रास लक्षात घेता व अनेक महिलांनी जेष्ठ नागरिकांनी विद्यार्थ्यांनी माझ्याकडे केलेल्या ताक्रारी वरून अधीक्षक राज्य उत्पादक शुल्क परभणी यांनी माझ्या दि.११ डिसेंबर २०२३ रोजी दिलेल्या पत्राची दखल घेत सदरील दुकान स्थलांतरित केले आहे त्यामुळे प्रथमतः राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधिकारी/कर्मचाऱ्यांचे धन्यवाद.... माझा लढा जनतेच्या हितासाठी असल्याने मी सदैव जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा राहिल असे प्रसार माध्यमांशी बोलतांना वंचित बहुजन आघाडीचे युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड म्हणाले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या