🌟पुर्णा शहर भारतीय बौद्ध महासभेच्या शहराध्यक्षपदी बौधाचार्य उमेश बाऱ्हाटे यांची निवड....!


🌟यावेळी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पूर्णाच्या वतीने नोटरी धारक वकील संघाचा जाहीर सत्कार🌟

पुर्णा : पुर्णेतील डॉ बाबासाहेब आंबेडकर सांस्कृतिक सभागृह येथे काल शनिवार दि.१६ मार्च २०२४ रोजी सायंकाळी ठीक ०७-०० वाजेच्या सुमारास भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष सुनील मगरे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक आयोजित करण्यात आली होती या बैठकीत प्रामुख्याने भारत सरकार नियुक्त नोटरी वकील संघ  यांचा जाहीर सत्कार करण्यात आला. त्यात प्रामुख्याने ॲड.सिद्धार्थ खरे,ॲड.सूर्यकांत काळे,ॲड.सुहास रावळे,ॲड.एस.एस.नागठाणे, ॲड.राहुल कांबळे, ॲड.हिरानंद गायकवाड,ॲड.धम्मा जोंधळे, ॲड.सुभाष साळवे,ॲड.दीपक सोनकांबळे इत्यादी वकिलांचा समावेश होता सर्व नोटरी धारक वकील संघाचे भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पूर्णाच्या वतीने अभिनंदन करण्यात आले व त्यांच्या पुढील वाटचालीस त्यांना हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या. 

यावेळी भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा पूर्णाच्या वतीने पुर्णा शहर शाखेची नूतन कार्यकारणीची निवड करण्यात आली. त्यात प्रामुख्याने बोद्धाचार्य उमेश बाऱ्हाटे यांची सर्वानुमते अध्यक्ष पदी निवड करण्यात आली. कार्यकारणी पुढील प्रमाणे :

सरचिटणीस : मनोज सीताराम मुळे

कोषाध्यक्ष : ईश्वर नामदेव वेडे

संरक्षण उपाध्यक्ष : पंजाब नारायण मनवर

संरक्षण सचिव : भारत लक्ष्मण भगत

प्रचार व पर्यटन : अशोक गंगाधर खरे

कार्यालयीन सचिव : क्रंतिकार सटवाजी ढगे

प्रचार व पर्यटन उपाध्यक्ष : भगवान मेसाजी जोंधळे

संघटक : उत्तम किशन वाव्हळे

प्रवीण वामन काशिदे ,परमेश्वर उत्तम वाघमारे, विश्वनाथ आढाव यांची निवड करण्यात आली.

सर्व नूतन शहर कर्यकरणीचे भारतीय बौध्द महासभा तालुका शाखा पूर्णा च्या वतीने अभिनंदन करुन पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या या बैठकीस प्रामुख्याने वंचित बहुजन आघाडी युवा जिल्हाध्यक्ष तुषार गायकवाड यांनी नूतन कार्यकारणी शुभेच्छा दिल्या. बैठकीस यशस्वी करण्यासाठी तालुका शाखा पूर्णा च्या आनंद वाहिवळ , धम्मा खंदारे, राजू गायकवाड, राहुल कचरे, आनंद गायकवाड, धारबा धुमाळे सर, किशोर ढाकरगे सर, बौद्धाचार्य त्रिंबक कांबळे, अतुल गवळी,इत्यादी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या