🌟 नांदेड येथील दत्तोपंत डहाळे यांना समाजभूषण पुरस्कार जाहीर....!


🌟नाशिक येथील एका खास कार्यक्रमात डहाळे यांना समाजभूषण पुरस्कार प्रदान केला जाणार🌟 

परभणी/नांदेड :  नांदेड येथील संत पाचलेगांवकर महाराजांचे अनुयायी दत्तोपंत डहाळे यांना नाशिक येथील सुवर्णकार मंडळातर्फे समाजभूषण पुरस्कार जाहीर झाला असून ११ मार्च रोजी तो पुरस्कार नाशिक येथील एका खास कार्यक्रमात डहाळे यांना प्रदान केला जाणार आहे.

           गेल्या ४० वर्षांपासून दत्तोपंत डहाळे हे संत पाचलेगांवकर महाराज यांच्या विधायक व राष्ट्रोपयोगी कार्यात सक्रिय आहेत. विशेषतः रक्तदान, श्रमदान, आरोग्य शिबीरे घेवून सोनार समाजातील असंख्य व्यक्तींना या कार्यात प्रेरित केले आहे. एक उत्तम वक्ता म्हणून संत पाचलेगांवकर महाराज यांच्या जीवन कार्यावर सातत्याने लेखन करीत राष्ट्रीय भावना जागृत करण्याचे काम वयाच्या 75व्या वर्षातही ते करीत आहेत. म्हणूनच त्यांना या पुरस्काराने विभूषित करण्यात येणार असल्याची माहिती मंडळाच्या अध्यक्षा श्रीमती मीना सोनार यांनी दिली.

          दरम्यान, दत्तोपंत डहाळे यांना यापूर्वी सेलू येथील सुभद्रा प्रतिष्ठानचा सुभद्रा पुरस्कार, मंठा येथील साहित्यरत्न, पैठण येथील संस्थेचाही सेवा कार्याचा पुरस्कार प्राप्त झालेला आहे. दत्त सांप्रदायाचे दत्तात्रय दहिवाळ महाराज महामंडळेश्‍वर यांनीही डहाळे यांना सन्मानित केले आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या