🌟राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेच्या अंतीम फेरीतील अभिनयाचा प्रथम पुरस्कार किशोर पुराणिक यांना प्रदान....!


🌟नाट्य निर्माते प्रसाद कांबळी व सिनेनाट्य अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान🌟 

परभणी (दि.13 मार्च) : महाराष्ट्र शासनाच्या कामगार कल्याण मंडळातर्फे आयोजित 69 व्या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेच्या अंतीम फेरीतील अभिनयाचा प्रथम पुरस्कार किशोर पुराणिक यांना नाट्य निर्माते प्रसाद कांबळी व सिने नाट्य अभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांच्याहस्ते काल मंगळवार दि.12 मार्च 2024 रोजी सायंकाळी मुंबईत प्रदान करण्यात आला.

            मुंबईतील विक्रोळी येथील कामगार कल्याण केंद्राच्या स्वातंत्र्यवीर सावरकर नाट्यगृहात आयोजित केलेल्या खास कार्यक्रमात पुराणिक यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. कामगार कल्याण मंडळाच्या राज्यस्तरीय नाट्य स्पर्धेत नाशिक येथील अंतीम फेरीत ललित कला भवन परभणीचे प्रा. रविशंकर झिंगरे लिखित व विजय करभाजन दिग्दर्शीत ‘गंमत असते नात्यांची’ हे नाटक सादर झाले होते. या नाटकातील कलावंत किशोर पुराणिक यांना अभिनयाचे महाराष्ट्रातील प्रथम पारितोषिक प्राप्त झाले होते. या स्पर्धेची प्राथमिक फेरी छत्रपती संभाजी नगरात झाली होती. या मधून या नाटकाची अंतीम फेरीसाठी निवड करण्यात आली होती. य नाटकात किशोर पुराणिक, डॉ. अर्चना चिक्षे, मोनिका गंधर्व, वैभव उदास, सतीश पुरी, सुभाष कांबळे यांच्या भूमिका आहेत. तर नेपथ्य स्नेहल पुराणिक, संगीत त्र्यंबक वडसकर, प्रकाशयोजना नारायण त्यारे, रंगभूषा, वेशभूषा आयुशू चिक्षे, विश्‍वनाथ साखरे, कार्तिक विश्‍वामित्रे, आयर्न पाटोळे, अतूल साळवे, खालेद मामू यांची होती.

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या