🌟चंद्रपूर येथे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीची बैठक संपन्न...!


🌟यावेळी जिल्हा प्रभारी म्हणून विनय कराड यांनी स्वतः उपस्थित राहून बैठकीत लोकसभा निवडणूकीचा आढावा घेतला🌟


चंद्रपुर : चंद्रपूर येथे लोकसभा निवडणुकी संदर्भात काल गुरुवार दि.२१ मार्च २०२४ रोजी बैठक आयोजित करण्यात आली होती सदरील बैठक भारतीय जनता पार्टीचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष हरीशजी शर्मा यांच्या उपस्थित घेण्यात आली.


यावेळी जिल्हा प्रभारी म्हणून विनय वाल्मिक कराड यांनी स्वतः उपस्थित राहून बैठकीत लोकसभा निवडणूकीचा आढावा घेतला व सुधीर मुनगंटीवार यांना महाराष्ट्रात सर्वधिक मतानी निवडून देण्यचे आवाहन केले यावेळी उपस्थित पदाधिकारी भारतीय जनता पार्टी भटके विमुक्त आघाडी च्या सीमाताई कश्यप, प्रदेश महामंत्री डॉक्टर रोहित माडेवार साहेब,प्रदेश उपाध्यक्ष किशोर सायगान, महामंत्री अश्विनीताई नागूलवार, अर्चनाताई कोटेवार, महिला आघाडी जिल्हाध्यक्ष अनिता ताई देशाट्टीवर आदी उपस्थित होते.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या