🌟महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकीय नेते तथा परभणी लोकसभा उमेदवार महादेव जानकर यांचा परीचय....!


🌟महादेव जानकर यांनी २००३ साली राष्ट्रीय समाज पक्ष स्थापन केला🌟

महादेव जानकर माजी पशुसंवर्धन, दुग्ध व मत्स्यविकास कॅबिनेट मंत्रि,महाराष्ट्र.यांचा जन्म १९ एप्रिल १९६८ माण, महाराष्ट्र राजकीय पक्ष- राष्ट्रीय समाज पक्ष, व्यवसाय- राजकारण, धर्म- हिंदू, विचारसरणी-महाराजा यशवंतराव होळकर यांचा विचार आणि फुलेवादी विचार .

महादेव जानकर हे महाराष्ट्रातील एक प्रमुख राजकीय नेते असून त्यांनी राष्ट्रीय समाज पक्षाची स्थापना केली आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, महात्मा फुल्यांच्या विचारांचा वारसा जपणारा आपला पक्ष आहे असा त्यांचा दावा आहे. दलित, आदिवासी, ओबीसी, अल्पसंख्यांक हा राष्ट्रीय समाज पक्षाचा प्रमुख मतदार आहे. जानकर यांचा जन्म पळसावडे, ता. माण, जी. सातारा येथे झाला. त्यांचे शिक्षण वालचंद अभियांत्रिकी महाविद्यालय, सांगली येथे झाले असून ते अभियांत्रिकी पदवीधर आहेत. तरुण वयात जानकर यांच्यावर कांशीराम यांच्या विचारांचा प्रभाव होता. कांशीराम यांच्या बहुजन समाज पक्ष पासून प्रेरणा घेऊन जानकर यांनी महाराष्ट्रात राष्ट्रीय समाज पक्ष स्थापन केला. पश्चिम महाराष्ट्रात तुलनेने जास्त असणाऱ्या धनगर समाजातील जानकर आहेत. तसेच त्यांची ताकद मराठवाड्यातही आहे. त्यामुळे त्यांना डावलणे सहज सोपे नव्हते. त्यामुळे भाजपने त्यांना विधानपरिषदेवर घेऊन त्यांना मंत्रिपद देण्याचे निश्चित केले . जानकर हे माण तालुक्यातील पळसावडे या गावचे आहेत.

राजकीय कार्य

महादेव जानकर यांनी २००३ साली राष्ट्रीय समाज पक्ष स्थापन केला. जानकर हे या पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष असून हा पक्ष प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, आसाम, बिहार, कर्नाटक, उत्तरप्रदेश, गोवा अशा राज्यात अनेक निवडणुका लढवतो. २००४ च्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत रासपाचे ३८ उमेदवार रिंगणात होते. त्यांना एकूण १४४,७५३ मते मिळाली जी एकूण मतांच्या ०.३५% होती. २००४ साली लोकसभा निवडणुकीत त्यांनी महाराष्ट्र आणि कर्नाटक मधून १२ उमेदवार उभे केले. रासपाला एकूण १४६,५७१ (०.०४%) मते मिळाली. २००९ साली लोकसभा निवडणुकीत पक्षाने महाराष्ट्रात २९, आसाममध्ये २, गुजरात आणि कर्नाटकात प्रत्येकी १ याप्रमाणे उमेदवार उभे केले. त्यांना महाराष्ट्रात एकूण १९०,७४३ आणि देशभरातून २०१,०६५ मते मिळाली. पक्षाध्यक्ष [[महादेव जानकर स्वतः माढा लोकसभा मतदारसंघ मध्ये शरद पवार(राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष) आणि सुभाष देशमुख (भारतीय जनता पार्टी) यांच्या विरोधात उभे राहिले होते. त्यांना एकूण मतांच्या १०.७६ % मते प्राप्त झाली. २०१४ च्या लोकसभा निवडणुकीत जानकर हे बारामती लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उभे राहिले होते. जानकर यांना एकूण ४५१,८४३ मते प्राप्त झाली. सुळे यांना ४८.८८ % मते प्राप्त झाली तर जानकर यांना ४२.३५ % मते मिळाली.आता २०२४ परभणी लोकसभा मतदारसंघ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कोट्यातून महादेव जानकर अधिकृत उमेदवार घोषित झालेले आहेत व दिनांक २ एप्रिल २०२४ मंगळवार रोजी परभणी लोकसभा निवडणुकीत महायुती चे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व भारतीय जनता पार्टी राष्ट्रीय सचिव तथा बिड लोकसभेच्या उमेदवार पंकजा पालवे यांच्या सह अनेक नेत्यांच्या उपस्थितीत आपला उमेदवारी अर्ज दाखल करणार असल्याचे प्रसार माध्यम प्रतिनिधी जवळ सांगितले आहे.

धन्यवाद साभार : सोनपेठ (दर्शन) 

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या