🌟हिंगोली-मुंबई सीएसएमटी-हिंगोली जनशताब्दी एक्सप्रेसला सेलू आणि परतूर थांबा....!


🌟अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या नांदेड येथील जनसंपर्क विभागाने दिली🌟


परभणी (दि.14 मार्च) : हिंगोली-मुंबई सीएसएमटी-हिंगोली जनशताब्दी एक्सप्रेसच्या वेळापत्रकात दक्षिण मध्य रेल्वे विभागाने बदल केला असून ही एक्सप्रेस सेलू आणि परतूर या दोन्ही रेल्वेस्थानकावर थांबविण्यात येणार आहे.

          गाडी क्रमांक 12072, 12071 हिंगोली-मुंबई सीएसएमटी-हिंगोली जनशताब्दी एक्सप्रेसच्या वेळापत्रकात 10 मार्च पासून बदल करण्यात आला आहे. तसेच या एक्सप्रेसला दोन्ही दिशेला सेलू आणि परतूर स्थानकावर प्रायोगिक तत्वावर थांबा देण्यात आला आहे. आज 14 मार्च पासून त्याची अंमलबजावनी होणार आहे, अशी माहिती दक्षिण मध्य रेल्वे विभागाच्या नांदेड येथील जनसंपर्क विभागाने दिली.....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या