🌟हिंगोली जिल्ह्यातील खैरी घुमट येथील कानिफनाथ गडावर रंगला शिखरी काठ्याचा नेत्रदीपक रिंगण सोहळा....!


🌟तर दुपारच्या सुमारास कानिफनाथ महाराजांच्या पालखीची भव्य मिरवणूक निघाली होती🌟


 
✍🏻शिवशंकर निरगुडे - हिंगोली 

हिंगोली जिल्ह्यातील सेनगाव तालुक्यातील खैरी घुमट येथील कनिफनाथ गडावर आज दि 19/03/2024 पासून यात्रेला सुरुवात झाली आहे मराठवाड्यासह विदर्भातील भाविक मोठ्या प्रमाणात आज दर्शनासाठी येतात.

सेनगाव तालुक्यातील खैरी घुमट येथील कनिफनाथ गडावर आज शिखरी काठ्याचा नेत्रदीपक रिंगण सोहळा मोठ्या उत्साहात फार पडला नांदेड जिल्ह्यातील डॊरली येथील कावडीचे आगमन झाल्यावर या यात्रेला सुरुवात होते व तसेंच खडकी येथील अबदागिरी व बोरखेडी पिनगाळे व हत्ता नाईक येथीलदेवाचे  बाण यांच्या भेटी होतात  शेकडो वर्षा पासून ही परंपरा अखंडपणे सुरू आहे ही यात्रा पंच दिवस भरते आज ता 19 मंगळवारला शिखरी काठ्याची मिरवणूक पार पडली  दुपारी चार कानिफनाथ महाराजांच्या पालखीची मिरवणूक निघाली त्या पालखीच्या पाठीमागें वेगवेगळ्या गावातील मानाच्या शिखरी  काठ्या व भगवे ध्वज हातात घेऊन भाविकांनी मंदिराला प्रदक्षिणा घालतात त्यानंतर मंदिरात शिखरी काठ्या हातावर घेऊन नृत्य देखील केले जातात हा नेत्रदीपक रिंगण सोहळा पाहण्यासाठी विदर्भातील व मराठवाड्यातील हजारो भाविक यात्रेच्या निमित्ताने खैरी घुमट येथे येतात खैरी घुमट येथील मंदिर हें अत्यंत प्राचीन असून हें मंदिर किल्लासदृश वास्तू भव्य असल्याने भाविकांत मोठे आकर्षण आहे. या किल्ल्यात हेमाडपंती पध्दतीचे कानिफनाथचे मंदिर आहे. येलदरी धरणाच्या जलाशयाच्या काठावर हें मंदिर असल्याने त्यांच्या वैभवात अधिकच भर पडली आहे.

यात्रेनिमित्त हजारो भावीक दर्शनासाठी येत आहेत यात्रेच्या निमित्ताने मंदिर समिती कडून दोन दिवस शंकर पटाचे आयोजन देखील करण्यात आले आहे व सेनगाव पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक संतोष तांबे साहेब यांनी या ठिकाणी चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या