🌟परभणीतील आर.पी.हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट येथे २७ मार्च रोजी भव्य बाल आरोग्य शिबिराचे आयोजन....!


🌟नवजात शिशूंच्या आजाराच्या तपासणीसह लसीकरण ही होणार🌟

परभणी (दि.२५ मार्च) - परभणी शहरातील पेडगाव परिसरातील परभणी-मानवत रोडवर असलेल्या श्री धनेश्वरी मानव विकास मंडळ संचलित आर.पी.हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट येथे बुधवार दि.२७ मार्च २०२४ रोजी सकाळी १०-०० ते सायंकाळी ०५-०० वाजेपर्यंत भव्य बाल आरोग्य शिबिरासह नवजात शिशू चे आजार आणि लसीकरण शिबीर देखील आयोजित करण्यात आले आहे.


आर.पी.हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट येथे आयोजित भव्य बाल आरोग्य शिबिरात नवजात शिशूचे आजार व लसीकरण,लहान मुलांचे श्वसनक्रियेचे आजार बाल दमा, लहान मुलांचे पोटाचे विकार (गॅस्टो),लहान मुलांचे शस्त्रक्रिया, लहान मुलांचे मेंदूचे विकार (तापेचे झटके), लहान मुलांच्या आहाराबद्दल समुपदेशन आदींची मोफत तपासणी केली जाणार असून या भव्य बाल आरोग्य शिबिरात सहभाग नोंदवणाऱ्या रुग्णांना तपासणी फिससह जनरल वार्ड बेडचार्ज देखील लागणार नसल्याचे आयोजकांनी म्हटले आहे.

श्री धनेश्वरी मानव विकास मंडळ संचलित आर.पी.हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट मध्ये सिटी स्कॅन,एक्सरे,युएसजी,२ डी.इको आदीं तपासणी सुविधा अल्पदरात असून शिबिरात भाग घेणाऱ्या रुग्णांना मोफत बससेवेची व्यवस्था करण्यात आली आहे आर.पी.हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट हे बाल रुग्णालय एनएबीएच मान्यताप्राप्त रुग्णालय असून रुग्णालयात २० खाटांचे (बेड) सुसज्ज अतिदक्षता विभाग (आयसीयू),तसेच २० खाटांचे नवजात अतिदक्षता विभाग (एनआयसीयू),१३ सुसज्ज व अत्याधुनिक ऑपरेशन थिएटर,१० खाटांचे सुसज्ज डायलिसिस युनिट,सुसज्ज ब्लड बँक आदीं अत्याधुनिक सुविधांसह सर्व प्रकारचे तज्ञ डॉक्टर्स रुग्णालयात सेवा बजावत असून रुग्णालयात २४ तास इमरजन्सी सेवा उपलब्ध राहणार आहे याशिवाय रुग्णालयात २४ तास प्रसुती विभाग कार्यरत राहणार आहे याशिवाय विशेष बाब म्हणजे या रुग्णालयात सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया अल्पदरात केल्या जाणार आहेत.

आर.पी.हॉस्पिटल ॲन्ड रिसर्च इन्स्टिट्यूट येथे बुधवार दि.२७ मार्च २०२४ रोजी आयोजित भव्य बाल आरोग्य शिबिरात बालरोग व नवजात शिशू तज्ञ डॉ.बाबासाहेब गायकवाड व बालरोग व नवजात शिशू तज्ञ डॉ.अजय गिरी 'रुग्न सेवा हिच ईश्वर सेवा' मानून सेवा बजावणार आहेत या भव्य बाल आरोग्य शिबिरात जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन डॉ.बाबासाहेब गायकवाड व डॉ.अजय गिरी यांनी केले असून या बाल आरोग्य शिबिरात सहभाग नोंदवण्यासाठी व अधिक माहितीसाठी आकाश वेडे मो.क्र.७६६६३८००६०, अभिषेक गजभर मो.क्र.९१३०६७४१७८,मोहन ठोंबरे मो.क्र.९६०७०७५४९८ व राहूल गायकवाड मो.क्र.७७९८४७२४०४ यांच्याशी संपर्क साधावा असे देखील आवाहन करण्यात आले आहे.........

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या