🌟पुर्णा तालुक्यातील कळगाव वाडी येथे विविध विकासकामाचे भूमिपूजन संपन्न....!


(फोटो : कळगाव वाडी येथे विकासकामाचे भूमिपूजन करतांना उपस्थित सर्व मान्यवर)

🌟जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव अग्रेसर राहण्याचा प्रयत्न करणार - ऋषिकेश सकनुर

पुर्णा (दि.०३ मार्च ) - पक्षातील वरिष्ठ पदाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाने व मतदारसंघातील लोकप्रतिनिधींच्या सहकार्याने जनतेचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव अग्रेसर राहण्याचा प्रयत्न करणार आहे. भारतीय जनता पार्टीचा विकासाचा विचार आणि वारसा जनतेपर्यंत पोहोचवण्यासाठी राजकारणात सक्रिय झालो आहे पुर्णा तालुक्यातील कळगाववाडी येथे विविध विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले यावेळी भाजप जिल्हा उपाध्यक्ष ऋषिकेश सकनुर बोलत होते.

          तालुक्यातील कळगाव वाडी येथे  महाराष्ट्र राज्य सरकारच्या ग्रामविकास व पंचायतराज विभागाच्या माध्यमातून २५१५ निधी अंतर्गत कळगाव वाडी येथे २० लक्ष रुपयांच्या विकास कामांचे भूमिपूजन करण्यात आले.१० लक्ष रुपये सिमेंट रोड व सुशोभीकरण,१० लक्ष विद्युतीकरण करणे, या कामांची सुरवात करण्यात आली यावेळी कळगाव सरपंच संदीप व्हावळे.उपसरपंच प्रकाश भंडे,पांडुरंग सकनुर, रामेश्वर सकनुर,उध्दव भंडे,आप्पाराव सकनुर, अंगद भूसनर, अतुल भुसनर, ज्ञानोबा भुसनर, देवराव सकनुर, पांडुरंग बरोले, उमाकांत सकनुर, भागवत सकनुर, सचिन मुलगीर, आदी गावकरी उपस्थिती होती......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या