🌟हत्ता नाईक येथे जागातिक महिला दिनाच्या निमित्ताने सुकन्या योजना सह विविध योजनेचे मार्गदर्शन.....!


🌟या कार्यक्रमा साठी गावातील महिला मंडळ तसेच प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते🌟


हिंगोली : जागतिक महिला दिनानिमित्त आज शुक्रवार दि.०८ मार्च रोजी हत्ता नाईक येथे पोस्ट ऑफिस शाखा डाकघर कार्यालय हत्ता यांच्या मार्फत सुकन्या योजना, सोलर योजना, ग्रामीण जीवन विमा, यासारख्या विविध योजनांची माहिती देण्यात आली आहे या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी मोहम्मद खदिल (डाग अधीक्षक परभणी गणेश देशमाने (सहाय्यक अधीक्षक परभणी) अध्यक्ष बाबासाहेब शिंदे (डाक निरीक्षक जिंतूर) प्रमुख पाहुणे सचिन कदम (विकास अधिकारी शाखा परभणी) राजेंद्र तुरे (शाखा डाकघर हत्ता) राजेंद्र तुरे यांनी गावात 101 कुटुंबांना सुकन्या समृद्धी योजने अतंर्गत खाते वाटप करण्यात आले तसेच महिला दिनानिमित्त पोस्ट ऑफीस च्या विविध योजनांची माहिती देण्यात आली आहे.

या कार्यक्रमा साठी गावातील प्रतिष्ठित नागरिक नामदेवराव वाणी, साहेबराव चव्हाण, शेख हकीम, ममताजी हिमगिरे,शीला हिमगिरे, सुदाम मानवतकर, तुकाराम पादरे, ज्ञानेश्वर गादेकर,अशोक देशमुख सेनगाव या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन राजेंद्र तुरे तर आभार प्रदर्शन शिलाताई हिमगिरे यांनी केली या कार्यक्रमा साठी गावातील महिला मंडळ तसेच प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या