🌟‘मतदारराजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’.....एनसीसी विद्यार्थ्यांची पथनाट्यातून चौकाचौकात जनजागृती...!


🌟 वाशिम जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी बुवनेश्वरी एस.यांच्या मार्गदर्शनात जनजागृती🌟 

फुलचंद भगत

वाशिम - जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी बुवनेश्वरी एस. यांच्या मार्गदर्शनात लोकसभा निवडणूक - २०२४ करिता जिल्हा प्रशासन व नगर परिषद वाशिम यांच्याकडून मतदान जनजागृती करण्याकरीता बुधवार, २७ मार्च रोजी सकाळी शहरातून रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. 


रॅलीला हिरवी झेंडी दाखविताना जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी लोकशाही अधिक बळकट करण्यासाठी मतदान करावे, जेणेकरून मतदानाचा टक्का वाढेल. व मतदान जनजागृती रॅली काढण्यामागील हेतु सुद्धा साध्य होईल असे कळकळीचे आवाहन याप्रसंगी केले. याप्रसंगी जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे, मुख्याधिकारी डॉ. अपूर्वा बासुर, सहायक निवडणूक अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी राजेंद्र जाधव, उपविभागीय अधिकारी वैशाली देवकर, तहसिलदार निलेश पळसकर, तहसिलदार शीतल भडगकर, मुख्याधिकारी निलेश गायकवाड, एनसीसी अधिकारी  अमोल काळे यांच्या नेतृत्वात राष्ट्रीय छात्र सेनेच्या विद्यार्थी यांनी चौकाचौकात पथनाट्य सादर केले. या पथनाट्याला जिल्हाधिकारी व सर्व अधिकारी, कर्मचारी यांनी कौतूक केले. ‘सब मतदान करो’, ‘मतदार राजा जागा हो, लोकशाहीचा धागा हो’ अशा घोषणा देत एकूण ६५ एनसीसी विद्यार्थ्यांनी या रॅलीत सहभाग नोंदवला. या सर्व विद्यार्थ्यांचे बाकलीवाल चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अ‍ॅड. सुरेंद्रकुमार बाकलीवाल, शाळेचे मुख्याध्यापक बबनराव बिल्लारी, उपमुख्याध्यापक दंभीवाल, पर्यवेक्षिका सौ. भोंडे, एनसीसी अधिकारी अमोल काळे यांनी कौतुक केले......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या