🌟महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन.....!


🌟असे आवाहन सहायक संचालक श्रीमती गीता गुट्टे यांनी केले आहे🌟

परभणी (दि.07 मार्च) :  सहायक संचालक कार्यालयांतर्गत वीरशैव लिंगायत समाजाचा सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास होण्यासाठी कलात्मक, समाजप्रबोधन व साहित्य क्षेत्रात कार्य करणा-या कलावंत, साहित्यिक, समाज प्रबोधनकार आणि समाजसेवकांना तसेच समाजासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना प्रतिवर्षी वैशाख शुध्द (अक्षय तृतीया) या दिवशी एक व्यक्ती व एक संस्थांना "महात्मा बसवेश्वर सामाजिक समता-शिवा पुरस्कार" देण्यात येणार आहे. प्रस्ताव सादर करतेवेळी विरशैव लिंगायत समाजासाठी करण्यात आलेले कार्य या संदर्भातील माहिती व कागदपत्रे जोडणे आवश्यक असून त्याबाबतचे प्रस्ताव विहीत नमुन्यात दि. 15 मार्चपर्यंत सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथे विहीत नमुन्यात दाखल करण्याचे आवाहन सहायक संचालक श्रीमती गीता गुट्टे यांनी केले आहे.....

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या