🌟परभणी जिल्ह्यातल्या शाळांना अनुदान योजनेसाठी प्रस्ताव पाठवण्याचे आवाहन.....!


🌟यासाठी इच्छुक शाळांकडून संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडे दि.12 मार्चपर्यंत प्रस्ताव सादर करता येतील🌟

परभणी (दि.06 मार्च) : राज्यातील नोंदणीकृत शाळांच्या आधुनिकीकरणासाठी धार्मिक अल्पसंख्यांक विद्यार्थीबहुल शासनमान्य खाजगी अनुदानित, विना अनुदानित, कायम विना अनुदानित शाळा, कनिष्ठ महाविद्यालये, औद्योगिक प्रशिक्षण संस्था, नगरपरिषद व अपंग शाळांमध्ये पायाभूत सोयी सुविधा पुरविण्यासाठी अनुदान योजना सन 2023-24 योजनेअंतर्गत पात्र शाळांकडून शासनास अनुदानासाठी शिफारस करण्यात येत आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे.

यासाठी इच्छुक शाळांकडून संबंधित जिल्हाधिकारी कार्यालयाकडे मंगळवार, दि. 12 मार्चपर्यंत प्रस्ताव सादर करता येतील. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून प्राप्त प्रस्तावांची छाननी आणि त्रुटीची पूर्तता करुन दि. 20 मार्चपर्यंत पात्र प्रस्ताव शासनास सादर करण्यात येणार आहेत. तरी इच्छुक शाळांनी विहित मुदतीत प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी रघुनाथ गावडे यांनी केले आहे.

वरील सर्व योजना सन 2023-24 या वर्षासाठी राबविण्यात येणार असून, या योजनेअंतर्गत अनुदान मिळवू इच्छिणा-या शाळांकडून प्राप्त प्रस्तावाची जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती मार्फत अल्पसंख्यांक विकास विभागाच्या शासन निर्णयामध्ये विहीत केलेल्या निकषानुसार तपासणी करुन पात्र शाळांची शासनास शिफारस करण्यासाठी प्रस्ताव पाठविण्यात येणार आहे......

*****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या