🌟परभणी लोकसभा निवडणूक : निवडणूक निरिक्षक (खर्च) अनुराग चंद्रांनी घेतला गंगाखेड मतदार संघाचा आढावा...!


🌟गंगाखेड येथील तहसिल कार्यालयात श्री.चंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठक संपन्न🌟


परभणी (दि.30 मार्च) :  लोकसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या अनुषंगाने 97- गंगाखेड विधानसभा मतदार संघात आदर्श आचार संहितेची अंमलबजावणी बाबत भरारी पथक, बैठे पथक, स्थिर चित्रीकरण पथक, चित्रीकरण तपासणी पथक यांचेसह निवडणूक खर्च पथक तसेच खर्च सनियंत्रण पथक यांचा भारत निवडणूक आयोगामार्फत नियुक्त निरीक्षक निवडणुक (खर्च) अनुराग चंद्रा यांनी आज आढावा घेतला.

गंगाखेड येथील तहसिल कार्यालयात श्री. चंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी सहायक निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी जिवराज डापकर, तहसिदार माधवराव बोथीकर, कैलासचंद्र वाघमारे, प्रदिप शेलार आणि संपर्क अधिकारी सचिन कवठे यांची उपस्थिती होती या बैठकीमध्ये सर्व पथकांना निवडणूक खर्चाचे अनुषंगाने कामजाबाबत आवश्यक सुचना देवून आढावा घेण्यात आला. तसेच मौजे चुडावा, झीरो फाटा, पेठशिवणी व बनवस येथे स्थापन करण्यात आलेल्या चेक पोस्टला भेट देवून पाहणी केली बैठकीस यावेळी सर्व नोडल अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते......

****

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या