🌟बळीराजा साखर कारखाना व रिलायबल ॲग्रो फुड्सच्या आड चालणाऱ्या कत्तल खाण्यामुळे जनसामान्यांचे आरोग्य धोक्यात....!


🌟पुर्णा तालुक्यातल्या अनेक गावांतील ग्रामस्थांसह आसपासच्या परिसरातील शेतकरी देखील त्रस्त🌟


✍🏻विशेष वृत्त : चौधरी दिनेश 

पुर्णा तालुक्यातील कानडखेड शिवारात असलेल्या बळीराजा साखर कारखाना व याच कारखान्यालगत रिलायबल ॲग्रो फुड्सच्या नावावर चालणाऱ्या कत्तलखाण्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांसह आसपासच्या गावांतील ग्रामस्थ अक्षरशः त्रस्त झाले असून बळिराजा साखर कारखान्याच्या बॉयलर मधून मोठ्या प्रमाणात निघणाऱ्या कार्बन अर्थात काजळीमुळे तसेच कारखान्यातील आउटलेट मधून वाहणाऱ्या केमीकलयुक्त दुषीत पाण्यामुळे परिसरातील शेतकऱ्यांच्या शेतातील उत्पन्नासह पुर्णा कानडखेड तसेच आसपासच्या गावातील नागरिकांच्या आरोग्यावर देखील याचा गंभीर परिणाम होतांना पाहावयास मिळत असून बळीराजा कारखान्यातील बॉयलर मधून निघणाऱ्या कार्बन अर्थात काजळीमुळे तर याच परिसरातील रिलायबल ॲग्रो फुड्सच्या आड चालणाऱ्या कत्तल खाण्यातील प्रचंड दुर्गंधीमुळे परिसरातील शेतकऱ्यांसह ग्रामस्थांना अक्षरशः श्वास घेणे देखील मुश्किल झाले असून चोवीस तास चालणाऱ्या या कत्तल खाण्यात प्रतिरोज जवळपास चारशें ते पाचशें दुधाळ व गाभन म्हशींची बेकायदेशीर कत्तल केल्या जात असून याच कत्तल खाण्यात जनावरांच्या हाडांवर देखील प्रक्रिया करुन त्याची पावडर निर्मिती केली जात असल्याने पुर्णा,कानडखेडसह परिसरातील अनेक गावांमध्ये दुर्गंधी पसरत असल्याने नागरिकांच्या आरोग्यावर याचा दुष्परिणाम होतांना पाहावयास मिळत आहे.


पुर्णा तालुक्यातील कानडखेड शिवारातील बळीराजा साखर कारखान्याने यावर्षी नव्याने उंची वाढवून लावलेल्या बॉयलर मधून प्रचंड प्रमाणात निघत असलेले कार्बन अर्थात काजळी कानखेडसह गौर,आडगाव (आगलावे), आडगाव (लासीना),धनगर टाकळी,खुजडा व आसपासच्या गावांसह पुर्णा शहरातील रेल्वे लोहमार्गा पलीकडील अनेक वसाहतींसह शहरातील अण्णाभाऊ साठे नगर,कुंभार गल्ली,भिमनगर,कोळीवाडा,धनगर गल्ली,कुरेशी मोहल्ला आदी भागात देखील हवेतून फैलत असल्यामुळे आदी परिसरातील नागरिकांना तसेच पहाटेच्या सुमारास मॉर्निंग वॉकसाठी फिरायला जाणाऱ्या दमा/शुगर/बिपी/हृदयविकारा सारख्या गंभीर आजारांनी त्रस्त असलेल्या वयोवृद्ध तसेच महिला शाळा/महाविद्यालयात शिकवणारे विद्यार्थी विद्यार्थीनींना या काळजीचा प्रचंड त्रास सोसावा लागत असून कारखान्याच्या बॉयलर मधून निघणाऱ्या कार्बन अर्थात काजळीमुळे नागरिकांना श्वासा संबंधित, फुफ्फुस/हृदया संदर्भातील भयंकर असे विविध आजार तसेच चर्म रोगांचे आजार देखील होतांना दिसत आहेत.

पुर्णा तालुक्यातील कानडखेड शिवारातील बळीराजा साखर कारखाना व रिलायबल ॲग्रो फुड्सच्या नावावर चालणारा जनावरांचा कत्तलखाना प्रशासन परिसरातील नागरिकांच्या आरोग्य व्यवस्थेशी खेळत असल्यामुळे प्रदुषण महामंडळ तसेच जिल्हा प्रशासनाने या दोन्ही कारखान्यांच्या विरोधात कठोर कारवाई करावी अशी मागणी आसपासच्या शेतकऱ्यांसह नागरिकांतून होत आहे.......

टिप : सदरील विशेष वृत्तासह यातील माहितीची कॉफी करु नयेत....

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या