🌟पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकाच्या विकासाचा सुडचक्राने घेतला बळी ?


🌟दमरे प्रशासनातील प्रांतवाद्यांसह संधीसाधू राजकारण्यांनी पुर्णा जंक्शनच्या संपत्तीसह प्रगतीलाही लावली टाच ?🌟

🌟चुडावा-मरसूळ या ३.२२ किमी बायपास लोहमार्गासह भुमी अधिग्रहणालाही दिली रेल्वे मंत्रालयाने मंजूरी🌟


नांदेड/परभणी (विशेष वृत्त) :- देशाला स्वातंत्र्य मिळण्यापूर्वी पासून निजाम/इंग्रजांच्या राजवटीत देखील दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनातील अत्यंत महत्त्वाचे मध्यवर्ती रेल्वे जंक्शन स्थानक म्हणून ओळखल्या जाणारे पुर्णा रेल्वे जंक्शन स्थानक दक्षिण मध्य रेल्वे विभागातील भाषा/प्रांतवाद्यांच्या सुडचक्रात अक्षरशः होरपळून निघाल्याचे निदर्शनास येत असून शेंकडों एक्कर जमीन संपत्तीसह मुबलक प्रमाणात पाण्याची व्यवस्था शेकडो कर्मचारी निवासस्थान तसेच दक्षिण मध्य रेल्वेच्या उपविभागीय कार्यालयासह विविध महत्त्वाच्या रेल्वे कार्यालयांनी सुशोभित अश्या या पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकाच्या संपत्तीसह प्रगतीलाही टाच लावण्याचे निदर्शनास येत आहे.

पुर्णेच्या हक्काचे दक्षिण मध्य रेल्वे विभागीय कार्यालय पुर्णेत रेल्वेची शेकडों एक्कर जमीन असतांना देखील दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनातील प्रांतवाद्यांसह संधीसाधू राजकारण्यांनी नांदेड येथे कोट्यावधी रुपयांची जमीन संपत्ती खरेदी करून नांदेड येथे पळवण्याचे पाप तर केलेच याहीपेक्षा भयंकर संतापजनक बाब म्हणजे पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकावरील उपविभागीय कार्यालयासह रेल्वेची सर्वच महत्त्वाची कार्यालय नांदेड येथे स्थलांतरित करण्यात आली त्यामुळे साडेतीन/चार दशकांपूर्वी मराठवाड्यातील सर्वात सधन व वैभवशाली रेल्वे जंक्शन असलेल्या पुर्णा रेल्वे स्थानकाचे अक्षरशः वाटोळे झाले दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनातील प्रांतवाद्यांसह संधीसाधू राजकारण्यांचे सुडचक्र अद्यापही थांबले नसल्याचे निदर्शनास येत असून दक्षिण मध्य रेल्वे प्रशासनाच्या माध्यमातून केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने नुकतेच चुडावा-मरसूळ बायपास लोहमार्गाला मंजूरी देऊन उपरोक्त लोहमार्गासाठी भुमी अधिग्रहण करण्या संदर्भात दि.०५ मार्च २०२४ रोजी आदेश जारी केल्यामुळे आता पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकाचे महत्त्व आणखी कमी होणार असल्याने पुर्णेकरांमध्ये असंतोषाचे वातावरण निर्माण झाले असून सदरील मरसुळ-चुडावा बायपास मुळे भविष्यात पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकावरुन धावणाऱ्या लांब पल्ल्याच्या प्रवासी रेल्वे एक्स्प्रेस गाड्या या मार्गावरुन वळवण्यात आल्यास पुर्णा जंक्शन रेल्वे स्थानकाची अवस्था एखाद्या किरकोळ रेल्वे स्थानकासारखी होण्याची भिती व्यक्त होत आहे.....


टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या