🌟पुर्णेतील कोट्यावधींच्या रेल्वे डिझेल चोरी प्रकरणाला वेगळेच वळण कोट्यावधींच्या जागी लाखोंचे धोरण ? तपास गुलदस्त्यात ?


🌟डिझेल चोरी तपास प्रकरणावर प्रश्न चिन्ह : प्रकरणातील आरोपींना स्वतःच्या बचावाची हेतूपुरस्सर सुट दिल्याचा आरोप🌟

🌟पत्रकारांना गुन्ह्या संदर्भात माहिती दिल्यास पोलीसांना तपासात अडथळा येतो की आरोपींना स्वतःचा बचाव करण्यात ?🌟


नांदेड/परभणी : परभणी जिल्ह्यातील पुर्णेतील कोट्यावधींच्या रेल्वे डिझेल चोरी अर्थात घोटाळा प्रकरणाला वेगळेच वळण कोट्यावधींच्या जागी लाखोंचे धोरण अन् घोटाळ्यातील घोटाळेबाजांच्या घरांच्या दारांना अक्षरशः सोन्याचे तोरण एकंदर अशी अवस्था झाल्याचे निदर्शनास येत असून डिझेल चोरी अर्थात घोटाळा प्रकरणाच्या तपासावर आता गंभीर प्रश्न चिन्ह निर्माण झाल्याचे पहावयास मिळत असून पत्रकारांना या गंभीर प्रकरणाच्या तपासाची भनक सुध्दा लागता कामा नये या दृष्टीने पाऊल उचलली जात असून पत्रकारांना गुन्ह्या संदर्भात माहिती दिल्यास पोलीस तपास यंत्रणांना तपासात अडथळा येतो की आरोपींना स्वतःचा बचाव करण्यात ? या प्रश्नांनी काही जनहीतवादी पत्रकार देखील आता प्रश्नार्थक मुद्रेत वावरतांना दिसत आहेत तर काही माहिती संकलन संदर्भात 'भागते भुत की लंगोटी सहीं' असे म्हणून आत्मसंतूष्ट होऊन प्रसन्न मुद्रेत वावरतांना देखील पाहावयास मिळत आहेत.

पुर्णेतील रेल्वे डिझेल चोरी प्रकरण उघडकीस आणण्याची अत्यंत कौतुकास्पद व उल्लेखनीय कामगिरी परभणी जिल्हा पोलिस दलाच्या स्थानिक गुन्हें शाखेच्या पथकाने बजावली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने परभणी जिल्ह्यातील दैठणा पोलीस स्थानकाच्या हद्दीतील सिंगणापूर फाटा परिसरातून जवळपास सहा हजार लिटर रेल्वे डिझेल चोरी करुन जाणारे डिझेल टँकर दि.२९ जानेवारी २०२४ रोजी ताब्यात घेत डिझेल चोरी अर्थात डिझेल घोटाळा होत असल्याचे रेल्वे प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले परंतु रेल्वे प्रशासनाने या रेल्वे डिझेल डेपोतील डिझेल चोरी प्रकरणाचा तपास केवळ दि.२९ जानेवारी २०२४ रोजीच्या सहा हजार लिटर डिझेल चोरी प्रकरणा पुरताच मर्यादित ठेवून सखोल तपासाला कायमची बगल दिली सदरील घटनेला जवळपास दिड महिन्यांचा कालावधी उलटत असतांना देखील या प्रकरणातील आरोपींना सुनियोजित पद्धतीने वाचविण्याच्या दृष्टीनेच तपास सुरू असल्याचे बोलले जात आहे.

पुर्णेतील या रेल्वे डिझेल चोरी अर्थात डिझेल घोटाळा प्रकरणातील तपासाचा आढावा घेण्यासाठी दि.१८ फेब्रुवारी २०२४ रोजी ११-३० वाजेच्या सुमारास रेल्वे सुरक्षा बलाच्या पोलीस महानिरीक्षक आरोमासिंह ठाकूर यांनी पुर्णा जंक्शन स्थानक परिसरातील डिझेल डेपोला भेट दिली यावेळी त्यांनी स्थानिक पत्रकारांनी संवाद देखील साधला यावेळी बोलतांना त्यांनी पुर्णा रेल्वे जंक्शन स्थानक परिसरातील रेल्वे डिझेल डेपो प्रकरणात कोणाचीही गय केली जाणार नाही असे देखील आवर्जून सांगितले परंतु यानंतर देखील या प्रकरणातील तपासाला गती मिळाल्याचे निदर्शनास येत नाही उलट या प्रकरणातील अनेक आरोपींनी तपास अधिकाऱ्यांच्या हातावर तु......र.....देऊन अटकपूर्व जामिनासाठी जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज देखील केल्याचे व सोईस्कर रित्या तपासाला बगल दिल्याचे पाहावयास मिळाले.

दरम्यान पुर्णा डिझेल चोरी (तपासातील कागदोपत्री) प्रत्यक्षात घोटाळा या प्रकरणाच्या तपासात एकूण किती आरोपी रेल्वे सुरक्षा बलाने ताब्यात घेतले ? त्यांच्याकडून किती मुद्देमाल हस्तगत केला ? डिझेल चोरी प्रकरणातील किती डिझेल टँकर ताब्यात घेण्यात आले ? डिझेल चोरी प्रकरणात किती रेल्वे कर्मचाऱ्यांचा सहभाग ? डिझेल वाहतूक करणाऱ्या डिझेल टँकर मालकाने आतापर्यंत डिझेल चोरीसाठी किती डिझेल टँकरचा वापर केला ? या प्रश्नांची उत्तरं प्रसारमाध्यमांना अजूनही मिळालेली नाही या डिझेल चोरी अर्थात घोटाळा प्रकरणाचा तपास जोपर्यंत सिबीआय/प्रवर्तन निर्दशालय (ईडी) मार्फत होत नाही आणि या घटनेतील आरोपींना संबंधित तपास यंत्रणा ताब्यात घेऊन फेरतपासणी करीत नाही तोपर्यंत या प्रकरणातील सत्यता बाहेर येणार नाही अशी चर्चा दबक्या आवाजात रेल्वे कर्मचाऱ्यांमध्येच होतांना पाहावयास मिळत आहे......

टिप्पणी पोस्ट करा

0 टिप्पण्या